Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:30 IST

एका हतबल पित्याचं आपल्या मुलीप्रती असलेलं प्रेम पाहून सर्वच जण भावुक झाले आहेत.

इंटरनेटवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही धक्कादायक असतात, तर काही हसवणारे. मात्र काही व्हिडीओ मनाला स्पर्शून जातात. सध्या अशाच एका व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून तो पाहिल्यावर लाखो लोकांचे डोळे पाणावले आहेत. या व्हायरल क्लिपमध्ये एका हतबल पित्याचं आपल्या मुलीप्रती असलेलं प्रेम पाहून सर्वच जण भावुक झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीसोबत शाळेच्या बाकावर बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ एखाद्या सरकारी शाळेतील आहे. पण ज्या गोष्टीने इंटरनेटवरील लोकांच्या मनाला स्पर्श केला, ती म्हणजे या पित्याचे शब्द. थरथरत्या आवाजात तो पिता शाळेच्या शिक्षिकेला म्हणतो, "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका. हिला आई नाही. जर ही रडली, तर हिला गप्प कोण करणार? मी तिला खूप लाडाने-प्रेमाने वाढवलं आहे."

व्यक्तीने हे शब्द उच्चारले, तशी संपूर्ण वर्गात शांतता पसरला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिथे उपस्थित असलेली लहान मुलं देखील त्या वडिलांचं बोलणं ऐकून भावूक झाली. काही मुले मान खाली घालून उदास दिसली, तर काहींच्या डोळ्यांत पाणी स्पष्टपणे दिसलं. सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओवरून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गरज असेल तेव्हा वडील हे मुलीची आई देखील होतात. जेव्हा एखादा पिता प्रेम करतो, तेव्हा तो एक अभेद्य कवच बनतो, जो मुलाला कठीण प्रसंगातही संरक्षण देतो असं युजर म्हणत आहेत. एका वडिलांचं प्रेम आपल्या मुलासाठी सर्वात मजबूत ढाल कशी असू शकतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे असंही काही लोक म्हणत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Father's heart: 'Don't hit my daughter, she has no mother'

Web Summary : A viral video shows a father pleading with a teacher not to punish his daughter, explaining she has no mother. The heartbreaking scene resonated deeply online, with viewers touched by the father's love and vulnerability, recognizing a father's protective role.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओशाळाशिक्षक