Lokmat Sakhi >Social Viral > नळावरचे पांढरट डाग निघण्यासाठी १ सोपा उपाय, नळ दिसतील एकदम नवीन, नवेकोरे

नळावरचे पांढरट डाग निघण्यासाठी १ सोपा उपाय, नळ दिसतील एकदम नवीन, नवेकोरे

Easy Trick to remove hard water stain easily : घरच्या घरी स्वच्छता करण्याचे काम होईल एकमद सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 04:00 PM2024-01-19T16:00:28+5:302024-01-19T16:02:04+5:30

Easy Trick to remove hard water stain easily : घरच्या घरी स्वच्छता करण्याचे काम होईल एकमद सोपे

Easy Trick to remove hard water stain easily : 1 easy solution to get rid of white stains on faucets, faucets will look brand new | नळावरचे पांढरट डाग निघण्यासाठी १ सोपा उपाय, नळ दिसतील एकदम नवीन, नवेकोरे

नळावरचे पांढरट डाग निघण्यासाठी १ सोपा उपाय, नळ दिसतील एकदम नवीन, नवेकोरे

आपण घराचा दर्शनी भाग स्वच्छ दिसावा यासाठी कायम प्रयत्न करतो. पण घराच्या आतल्या बाजुला असणाऱ्या गोष्टींकडे मात्र आपले काहीवेळा दुर्लक्ष होते. त्यामुळे बाहेरुन घर स्वच्छ आणि चकचकीत दिसते. पण आतल्या लहान सहान गोष्टी मात्र कळकट्ट किंवा अस्वच्छ दिसतात. बांथरुममधले नळ हे त्यापैकीच एक असून अनेकदा नळांवर पडलेले पांढरे, खराब डाग आपल्याकडून साफ करायचे राहतात. साबणामुळे पांढरट पडतात किंवा गंजतात हे आपल्या डोक्यातच येत नाही. बोअरींगचे किंवा जड, मचूळ पाणी असेल तर हे डाग जास्त प्रमाणात पडतात (Easy Trick to remove hard water stain easily).

एकदा हे पांढरे डाग पडले की ते साध्या पाण्याने किंवा घासणीने घासून जात नाहीत. पण मग असे नळ वापरायला आपल्यालाच घाण वाटते. पण हे डाग खूप कष्ट न घेता किंवा खूप खर्च न करता स्वच्छ करायचे असतील आणि नळ नव्यासारखे चमकावेत असे वाटत असेल तर त्यासाठी नेमका उपाय काय? नळांवरचे हे पांढरट डाग कायमसाठी घालवायचे असतील तर त्यासाठी एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासूनच हा उपाय करायचा असल्याने यासाठी फारसा वेळही लागत नाही आणि स्वच्छताही मनासारखी होते. 

(Image : Google)
(Image : Google)

१. एका स्प्रे बाटलीमध्ये थोडे पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये व्हिनेगर घालायचे. 

२. यामध्ये काही प्रमाणात अल्कोहोल आणि डीश सोप घालायचे. 

३. हे मिश्रण हलवून चांगले एकजीव करायचे.

४. यातील सर्व घटक रासायनिक असल्याने आणि ते एकमेकांत मिसळल्याने एक वेगळ्या प्रकारचे रसायन तयार होते. 

५. स्प्रे बाटलीने हे रसायन पांढरे डाग पडलेल्या नळांवर मारायचे आणि काही वेळ तसेच ठेवायचे. 

६. नंतर सुती कापडाने हे स्टीलचे नळ स्वच्छ पुसून घ्यायचे

७. पांढरे डाग पडून खराब झालेले नळ काही मिनिटांत नव्यासारखे चमकायला लागतात. 

८. हा उपाय करायला अतिशय सोपा असून घरच्या घरी आपण तो सहज करु शकतो.   


 

Web Title: Easy Trick to remove hard water stain easily : 1 easy solution to get rid of white stains on faucets, faucets will look brand new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.