lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > व्हिडिओसाठी स्कुटीवर स्टंट करणं महागात पडलं, दोन तरुणी धपकन पडल्या आणि.. व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओसाठी स्कुटीवर स्टंट करणं महागात पडलं, दोन तरुणी धपकन पडल्या आणि.. व्हायरल व्हिडिओ

Social Viral Video स्टंट करणं महागात पडूच शकतं त्यातही वाहनावर बसून खेळ म्हणजे जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 02:03 PM2022-12-29T14:03:40+5:302022-12-29T14:04:57+5:30

Social Viral Video स्टंट करणं महागात पडूच शकतं त्यातही वाहनावर बसून खेळ म्हणजे जीवाला धोका

Doing a stunt on a scooter for a video was expensive, two young women fell down and.. viral video | व्हिडिओसाठी स्कुटीवर स्टंट करणं महागात पडलं, दोन तरुणी धपकन पडल्या आणि.. व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओसाठी स्कुटीवर स्टंट करणं महागात पडलं, दोन तरुणी धपकन पडल्या आणि.. व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर दुचाकीवर स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. ज्यात पापा की परीचे व्हिडिओ तुफान चर्चेत येतात. सध्या बहुतांश व्यक्ती हटके कंटेंट देण्यासाठी काहीही करू शकतात. व्हायरल होण्यासाठी काही जण स्वतःला देखील इजा करून घेतात. परंतु, धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात २ मुली दुचाकीवर स्टंटबाजी करत असताना धाडकन जमिनीवर आपटले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक मुलगी दुचाकी चालवत असते व तिच्या मागे एक मुलगी बसलेली आहे. 
बाईक चालवणारी मुलगी अचानक वेग वाढवते आणि बाईकवर स्टंट मारण्याचा प्रयत्न करते. पंरतु, वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने या तरुणीचा तोल जातो आणि बाईकवरून दोघीही जमिनीवर आपटतात.

काही जण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी भन्नाट स्टंटबाजी करण्याच्या उत्साहात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. या व्हिडिओतही दोघी आपल्या जीवावर बेतेल असे स्टंटबाजी करत असताना दिसत आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तरुणींची खिल्ली उडवली आहे. एकाने “पापा की परी कुणापेक्षाही कमी नाही.” अशी कमेंट केली. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं “पापा की परी हवा में उडी” अशी प्रतिक्रिया दिली. सध्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून, इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

Web Title: Doing a stunt on a scooter for a video was expensive, two young women fell down and.. viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.