lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > एका लग्नाची महागडी गोष्ट- बायकोच्या मैत्रिणीच्या लग्नात झाला ४ लाखांचा खर्च, वैतागलेला नवरा म्हणतोय.... 

एका लग्नाची महागडी गोष्ट- बायकोच्या मैत्रिणीच्या लग्नात झाला ४ लाखांचा खर्च, वैतागलेला नवरा म्हणतोय.... 

Viral Story of Expensive Marriage: अमेरिकेतल्या एका लग्नाची ही महागडी गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 05:48 PM2024-04-18T17:48:05+5:302024-04-18T17:49:11+5:30

Viral Story of Expensive Marriage: अमेरिकेतल्या एका लग्नाची ही महागडी गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.

Doctor in us says Rs 4 lakh spent to attend wife’s friend’s wedding, his post of expenses is viral on social media | एका लग्नाची महागडी गोष्ट- बायकोच्या मैत्रिणीच्या लग्नात झाला ४ लाखांचा खर्च, वैतागलेला नवरा म्हणतोय.... 

एका लग्नाची महागडी गोष्ट- बायकोच्या मैत्रिणीच्या लग्नात झाला ४ लाखांचा खर्च, वैतागलेला नवरा म्हणतोय.... 

Highlightsही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजत असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट आल्या आहेत. 

लग्नकार्य करणं म्हणजे मोठंच खर्चिक काम. म्हणूनच तर घर पहावे बांधून आणि लग्न बघावे करून असं आपल्याकडे म्हणतात ते काही उगाच नाही. या दोन्ही गोष्टींसाठी प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ लागतं. आता कुठलंही लग्न बघा आपण त्यासाठी जे बजेट ठरवलेलं असतं त्यापेक्षा जरा जास्तच खर्च होतो. मग ते लग्न आपल्या घरचं असो किंवा आपल्याला त्या लग्नात वऱ्हाडी म्हणून जायचं असो. अमेरिकेतल्या या एका लग्नाची गोष्टही तशीच आहे. 

 

त्याचीच तर स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बायकोच्या मैत्रिणीचं लग्न आपल्याला किती महागात पडलं, याची गोष्ट  Sravan Panuganti या एका डॉक्टरने स्वतःच @SPuro88 या सोशल हँडलवर शेअर केली आहे.

उन्हाळ्यात पिऊनच बघा थंडगार चोको मिल्क, मुलांसोबत स्वत:लाही द्या छान ट्रिट- बघा सोपी रेसिपी

त्यामध्ये तो असं सांगतोय की त्याच्या बायकोच्या अगदी जिवलग मैत्रिणीचं डेस्टिनेशन वेडिंग नुकतंच पार पडलं. या लग्नासाठीचे, बॅचलर पार्टीचे कपडे, ब्रायडल शॉवर या कार्यक्रमाची तयारी अशा सगळ्यासाठी त्याला एकूण ४ ते ५ लाख रुपयांच्या दरम्यान खर्च आला. या त्याच्या खर्चात आपल्याकडच्या एखाद्या गरिबाचं थाटामाटात लग्न झालं असतं, अशा आशयाच्या अनेक कमेंट त्याला आल्या आहेत. 

 

उत्साहाच्या भरात हा खर्च तर केला पण आता मात्र नाकी नऊ आलेले आहेत. जवळच्या मित्रांच्या लग्नासाठी अशा पद्धतीने जर खर्च झाला तर ते मित्र नाही मोठे शत्रूच वाटू लागतात,

कॉपर टी बसवायची भीती वाटते? डॉक्टर सांगतात, कॉपर टी बसवा- गैरसमज विसरा कारण..

असंही मजेशीर वाक्य त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. आपल्यापैकी काही जणांना मित्रमैत्रिणीच्या, भाऊ- बहिणीच्या लग्नात वारेमाप खर्च झाल्याचा अनुभव आलाच असणार..  ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजत असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट आल्या आहेत. 

 

Web Title: Doctor in us says Rs 4 lakh spent to attend wife’s friend’s wedding, his post of expenses is viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.