lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > 'आई उठते, पण मला उठवत नाही' शाळेत यायला उशीर का झाला? चिमुकला सांगतो भन्नाट कारण.. वाचा..

'आई उठते, पण मला उठवत नाही' शाळेत यायला उशीर का झाला? चिमुकला सांगतो भन्नाट कारण.. वाचा..

cried for coming late to school blamed mother in front of teacher - Funny viral video : आईमुळे शाळेत यायला लेट होतो, मुलाचे हे कारण ऐकून तुम्हीही हसाल पोटधरून...नेटकरी म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 12:47 PM2024-04-16T12:47:12+5:302024-04-16T13:42:41+5:30

cried for coming late to school blamed mother in front of teacher - Funny viral video : आईमुळे शाळेत यायला लेट होतो, मुलाचे हे कारण ऐकून तुम्हीही हसाल पोटधरून...नेटकरी म्हणाले..

cried for coming late to school blamed mother in front of teacher - Funny viral video | 'आई उठते, पण मला उठवत नाही' शाळेत यायला उशीर का झाला? चिमुकला सांगतो भन्नाट कारण.. वाचा..

'आई उठते, पण मला उठवत नाही' शाळेत यायला उशीर का झाला? चिमुकला सांगतो भन्नाट कारण.. वाचा..

'मुलं ही देवाघरची फुलं असतात.' त्यांचं मन खूप हळवं आणि नाजूक असतं (Social Viral). शिवाय त्यांच्या गोंडस हावभावामुळे आपलं मन खुश आणि आनंदित राहतं. मुलांना बघताक्षणी मन प्रसन्न होऊन जातं. त्यांच्या मुखातून पडलेले बोबडे बोल ऐकत रहावसे वाटतात. त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावते (Funny Video).

असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकला शाळेत लेट येण्यामागे आपली व्यथा सांगत आहे. शाळेत यायला का उशीर होतो या प्रश्नाचं अगदी खरं खरं उत्तर त्याने दिलं आहे, आणि हे उत्तर ऐकून आपण नक्कीच पोट धरून हसाल(cried for coming late to school blamed mother in front of teacher - Funny viral video).

'निराश आहात, ऑफिसला येऊ नका' कारण..एका कंपनीचा महत्वाचा निर्णय; केली 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा

'आई उठते पण मला उठवत नाही'..

व्हायरल व्हिडिओमध्ये चिमुकला शाळेत उशिरा पोहोचतो. तेव्हा एक शिक्षिका त्याला शाळेत उशिरा येण्यामागचं कारण विचारते. यावर मुलाने भन्नाट उत्तर दिलं आहे. वर्गात प्रवेश होताच मॅडम त्याला, 'शाळेची वेळ ७.३० ची आहे आणि तू ८.३० वाजता येतोस' असं ती म्हणते, त्यावर रडवेला आवाजात मुलगा, 'मम्मी स्वतः सकाळी उठते, पण मला नाही उठवत' असं तो म्हणतो. तेव्हा टीचर त्याला 'का?' असं प्रश्न विचारते. या प्रश्नाचं उत्तर देताना घाबरलेला चिमुकला 'मला माहित नाही' असं उत्तर देतो. त्याचा हा केविलवाणा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या आईलाच दोष दिलं आहे.

कोण म्हणतं टोमॅटोने टॅनिंग निघत नाही? अर्ध्या टोमॅटोला २ गोष्टी लावून रगडा; चेहरा चमकेल..

नेटकरी म्हणाले..

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. एका युजरने लिहिले, 'कदाचित चिमुकला सत्य बोलत असेल.' तर दुसऱ्याने, 'उशीरा येण्याचे कारण चांगले आहे.' तर एकाने आईची चूक असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे.

Web Title: cried for coming late to school blamed mother in front of teacher - Funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.