lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > 'निराश आहात, ऑफिसला येऊ नका' कारण..एका कंपनीचा महत्वाचा निर्णय; केली 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा

'निराश आहात, ऑफिसला येऊ नका' कारण..एका कंपनीचा महत्वाचा निर्णय; केली 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा

Chinese company introduces ‘unhappy leaves’: ‘Not happy, don't come to work please' : मूड खराब असेल तर, कर्मचाऱ्यांना मिळणार १० दिवस सुट्टी; बॉसचं होतंय कौतुक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 11:46 AM2024-04-16T11:46:15+5:302024-04-16T13:42:57+5:30

Chinese company introduces ‘unhappy leaves’: ‘Not happy, don't come to work please' : मूड खराब असेल तर, कर्मचाऱ्यांना मिळणार १० दिवस सुट्टी; बॉसचं होतंय कौतुक कारण..

Chinese company introduces ‘unhappy leaves’: ‘Not happy, don't come to work please' | 'निराश आहात, ऑफिसला येऊ नका' कारण..एका कंपनीचा महत्वाचा निर्णय; केली 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा

'निराश आहात, ऑफिसला येऊ नका' कारण..एका कंपनीचा महत्वाचा निर्णय; केली 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा

'आज काम करण्याची इच्छा होत नाही' असं आपण आठवड्यातून बऱ्याचदा म्हणतो (Social Viral). सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त आरामासाठी एक दिवस सुट्टी घेण्याची इच्छा प्रत्येकाला होते. पण विचार मनात आणूनही त्यावर अंबलबजावणी करणं जमेलच असे नाही (Mental Health). सुट्टीचा विचार बाजूला करून, बॅग घेऊन आपण ऑफिसच्या दिशेने चालायला लागतो. मन उदास असो, किंवा बॅड मूड. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत, आपण कामावर हजर राहतो. इच्छा नसतानाही आपल्याला लॅपटॉप उघडून कीबोर्ड बडवावा लागतो.

काही बॉस आपली बाजू समजून घेतात तर, काही कामावर लक्ष केंद्रित करा असं म्हणतात. पण कर्मचाऱ्यांच्या या समस्येवर चीनच्या एका कंपनीने मोठया मनाने तोडगा काढलेला आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १० दिवसांची ‘दुःखी रजा’ जाहीर केली असून, त्यांच्या या निर्णयाचं कौत्तुक करण्यात येत आहे(Chinese company introduces ‘unhappy leaves’: ‘Not happy, don't come to work please').

'निराश आहात? मग कामाला येऊ नका'

आजकाल बरेच व्यक्ती मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत, आणि याबाबत उघडपणे बोलायला कोणीही तयार नसतं. बऱ्याचदा आतल्या आत माणूस गुरफटतो. अशा स्थितीत चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीचा पुरेपूर विचार केला आहे. यासाठी त्यांनी 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा केली. वर्षभरात कर्मचारी १० सुट्ट्यांसाठी अर्ज करू शकतात.

IFS अधिकारी बनल्या 'कंबोडियाची अप्सरा' पिवळ्याधमक साडीत दिसतात जणू 'सोनपरी' नेटकरी म्हणाले..

या बाबतचा खास निर्णय मध्य चीनच्या हेनान प्रांतातील रिटेल चेन, पेंग डोंग लाईचे संस्थापक आणि अध्यक्ष यू डोंगलाई यांनी घेतला आहे. कर्मचाऱ्यांचा मूड ठीक नसल्यास ते दहा दिवसांची सुट्टी घेण्यासाठी पात्र असतील असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे कंपनीचे अध्यक्ष यू डोंगलाई म्हणतात, 'प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदीच असेल असे नाही, आणि आपण निराश असाल तर, कामावरही लक्ष लागत नाही. त्यामुळे अशावेळी आराम करणं गरजेचं आहे. सुट्टी घेऊन आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायला हव्या. मॅनेजमेंटकडून ही सुट्टी नाकारली जाणार नाही.' असं म्हणत त्यांनी 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा केली.

माठात राहील फ्रिजसारखं पाणी थंड! फक्त त्यात १ चमचा पांढरी गोष्ट मिसळा; फ्रिजचं पाणी विसराल

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

'अनहॅपी लिव्ह'ची माहिती सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली. नेटकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, कंपनीच्या मालकांचं तोंड भरून कौतुक केलं. एका नेटकऱ्याने 'एवढा चांगला बॉस मिळण्यासाठी कोणतं व्रत करावं लागतं', तर दुसऱ्याने, 'मी ३६५ दिवस मग उदास आणि निराश असेन' अशी गंमतीशीर कमेंट केली आहे. तर काहींनी ही पद्धत चीनमध्येच नाही जगभरात अवलंबली पाहिजे असंही म्हटलं आहे. 

Web Title: Chinese company introduces ‘unhappy leaves’: ‘Not happy, don't come to work please'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.