lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > कोण म्हणतं टोमॅटोने टॅनिंग निघत नाही? अर्ध्या टोमॅटोला २ गोष्टी लावून रगडा; चेहरा चमकेल..

कोण म्हणतं टोमॅटोने टॅनिंग निघत नाही? अर्ध्या टोमॅटोला २ गोष्टी लावून रगडा; चेहरा चमकेल..

Easy steps to use tomatoes for removing tan : अर्धा टोमॅटो घ्या अन् चेहऱ्यावर घासा, काळपट चेहऱ्यावर जबरदस्त नैसर्गिक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 10:00 AM2024-04-16T10:00:00+5:302024-04-16T10:00:02+5:30

Easy steps to use tomatoes for removing tan : अर्धा टोमॅटो घ्या अन् चेहऱ्यावर घासा, काळपट चेहऱ्यावर जबरदस्त नैसर्गिक उपाय

Easy steps to use tomatoes for removing tan | कोण म्हणतं टोमॅटोने टॅनिंग निघत नाही? अर्ध्या टोमॅटोला २ गोष्टी लावून रगडा; चेहरा चमकेल..

कोण म्हणतं टोमॅटोने टॅनिंग निघत नाही? अर्ध्या टोमॅटोला २ गोष्टी लावून रगडा; चेहरा चमकेल..

उन्हाळा सुरु होताच त्वचेच्या निगडीत समस्या वाढतात (Tanning). टॅन, मुरुमांच्या डाग, चेहरा काळपट पडणे यासह इतर समस्या वाढत जातात. टॅनिंग घालवण्यासाठी आपण संपूर्ण उन्हाळा ब्यूटी पार्लरच्या चकरा मारतो (Beauty Tips). शिवाय तिथे केमिकल उत्पादनांवर खर्च होतो, तो वेगळाच (Tomatoes). खर्चापेक्षा चेहऱ्याच्या निगडीत आणखीन समस्या निर्माण होतात. ज्यामुळे स्किन अधिक खराब होते.

केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण, टोमॅटोच्या वापराने टॅनिंग, व्हाटइहेड्स आणि ब्लॅकहेड्स, मृत त्वचा, यासह ओपन पोर्स देखील बंद होण्यास मदत होते. आपली त्वचा मऊ आणि चमकदार दिसावी असे वाटत असेल तर, टोमॅटोचा वापर कसा करावा? पाहूयात(Easy steps to use tomatoes for removing tan).

टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर कसा करावा?

स्टेप - १

सर्वप्रथम, टोमॅटो अर्धा चिरून घ्या. टोमॅटोवरच्या बिया काढून घ्या. त्यावर अर्धा चमचा साखर आणि एक टेबलस्पून मध घालून मिक्स करा. आता चेहरा धुवून घ्या. टोमॅटोवरील मिश्रणासह चेहऱ्यावर हलक्या हाताने रगडा. आपण ही क्रिया ५ मिनिटापर्यंत करू शकता.

स्टेप - २

आता टोमॅटोचा फेसपॅक तयार करा. यासाठी एक बाऊलमध्ये एक चमचा टोमॅटोचा रस घ्या. त्यात एक चमचा कॉफी, एक चमचा तांदुळाचं पीठ घालून मिक्स करा. चेहऱ्याला टोमॅटोने घासल्यानंतर ब्रश किंवा बोटाने पेस्ट चेहऱ्यावर लावा. १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. या फेसपॅकमुळे पिग्मेण्टेशन, मुरूम आणि काळपट पडलेली त्वचा उजळेल.

चेहऱ्यावर टोमॅटो लावण्याचे फायदे

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. शिवाय त्वचा टाइट आणि ग्लोइंग टोमॅटोचा गर किंवा रस चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकते. ज्यामुळे स्किन कायम ग्लो आणि फ्रेश दिसते. 

Web Title: Easy steps to use tomatoes for removing tan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.