lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला..

केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला..

Anand Mahindra shares video of man making huge paratha, Abhishek Bachchan reacts : काही व्हायरल व्हिडिओ पाहून आपल्यालाही प्रश्न पडतो की हे असं कौशल्य कुठं नक्की शिकत असतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 04:06 PM2023-12-20T16:06:00+5:302023-12-20T16:54:41+5:30

Anand Mahindra shares video of man making huge paratha, Abhishek Bachchan reacts : काही व्हायरल व्हिडिओ पाहून आपल्यालाही प्रश्न पडतो की हे असं कौशल्य कुठं नक्की शिकत असतील?

Anand Mahindra shares video of man making huge paratha, Abhishek Bachchan reacts | केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला..

केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला..

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियात फार सक्रीय असतात. त्यांनी शेअर केलेले व्हिडिओ नेटकऱ्यांकडून रिपोस्ट केले जातात. त्यातील काही व्हिडिओ भावनिक, मजेशीर तर, काही अचंबित करणारे ठरतात. महिंद्रा नेहमी भारतीयांचे टॅलेण्ट सोशल मीडियात शेअर करतात. शिवाय पोस्टच्या मध्यमातून चाहत्यांशी कनेक्टेड राहतात. अलीकडेच त्यांनी लोकांना अवाक करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सर्वात मोठा पराठा तयार करताना दिसून येत आहे (Social Viral). हा नक्की पराठा आहे की पिझ्झा असा देखील काहींना प्रश्न पडला आहे तर, काहींनी एवढा मोठा पराठा त्या व्यक्तीने तयार केलाच कसा? असा प्रश्न विचारात आहे(Anand Mahindra shares video of man making huge paratha, Abhishek Bachchan reacts).

एवढा मोठा पराठा तयार केलाच कसा?

आनंद महिंद्रा यांनी आपल्या एक्स अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक आचारी भला मोठा पराठा करताना दिसून येत आहे. सुरुवातीला तो व्यक्ती मोठा कणकेचा गोळा घेतो. तो कणकेचा गोळा लाटून घेतो. त्यात तो भाजीचं स्टफिंग भरून कणकेचा गोळा पॅक करून पराठा लाटून घेतो, व तव्यावर टाकून दोन्ही बाजूने शेकून घेतो. पराठा तयार झाल्यानंतर तो आचारी, तयार पराठा एका मोठ्या ताटात घेऊन येतो. त्यासोबत चटणी आणि दही देखील घेऊन येतो.

कॉफी आणि बेकिंग सोडा, २ उपाय- घरातल्या टॉयलेटमधली दुर्गंधी होईल गायब-राहील स्वच्छ

व्हिडिओ शेअर करत त्यांनी मजेशीर कॅप्शन देखील शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा लिहितात, 'पिझ्झा कोणाला हवंय? जर समोर पराठ्याचं ताठ असेल.' व्हायरल व्हिडिओ पाहून नक्कीच अनेकांना पराठा खाण्याची इच्छा झाली असेल. शिवाय या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेण्टचा वर्षाव केला आहे.

एड्स डे निमित्त फॅशन डिझायनरचा अनोखा प्रयोग, एक्स्पायर्ड कंडोमपासून तयार केला ड्रेस; नेटकरी म्हणाले..

अभिषेक बच्चनची कमेण्ट ठरली लक्षवेधी

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला पराठ्याच्या व्हिडिओवर सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय नेटकऱ्यांनी कमेण्ट करत या टॅलेण्टचं कौतुकही केलं आहे. या व्हिडिओवर एकाने 'खूप छान व्हिडिओ आहे', तर दुसऱ्याने 'पराठा हेल्दी असण्यासोबतच टेस्टी देखील दिसत आहे.' या व्हायरल व्हिडिओवर कमेण्ट करण्यास सिनेस्टार अभिषेक बच्चनही स्वतःला रोखू शकला नाही. त्याने 'Truth' (खरंय) असे कमेण्ट करून व्हिडिओला लाईक केलं आहे.

Web Title: Anand Mahindra shares video of man making huge paratha, Abhishek Bachchan reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.