lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > 'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग

'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग

Anand Mahindra shares adorable video of 2 girls 'reporting' snowfall in Kashmir : आनंद महिंद्र यांना आवडली २ चिमुकल्यांची रिपोर्टिंग, व्हिडिओ शेअर करताच मिळाले लाखोंच्या घरात लाईक्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 12:06 PM2024-02-08T12:06:17+5:302024-02-08T12:09:11+5:30

Anand Mahindra shares adorable video of 2 girls 'reporting' snowfall in Kashmir : आनंद महिंद्र यांना आवडली २ चिमुकल्यांची रिपोर्टिंग, व्हिडिओ शेअर करताच मिळाले लाखोंच्या घरात लाईक्स..

Anand Mahindra shares adorable video of 2 girls 'reporting' snowfall in Kashmir | 'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग

'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आपल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. ते नेहमी सोशल मिडीयाद्वारे लोकांना प्रेरणा देणारे व्हिडिओ शेअर करत असतात, आणि त्यांचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडतात. सध्या त्यांनी पोस्ट केलेला एक व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरला असून, त्यांनी हा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये २ चिमुकले बर्फवृष्टी होत असलेल्या ठिकाणी रिपोर्टिंग करताना दिसून येत आहे (Kashmir).

त्या छोट्याशा मुली बर्फवृष्टीचा आनंद तर लुटत आहेतच, यासह त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे 'लफ्ज' लक्षवेधी ठरत आहे (Social Viral). व्हायरल व्हिडिओमध्ये मुली नक्की  काय म्हणत्यात? त्यांनी केलेली रिपोर्टिंग लोकांना का भावली? पाहूयात(Anand Mahindra shares adorable video of 2 girls 'reporting' snowfall in Kashmir ).

मोठ्या मनाचं लहान लेकरु! स्पर्धा जिंकून मिळालेल्या पैशातून मदतनीस मावशीसाठी आणला फोन -व्हायरल पोस्ट

'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बीचोंबीच खडी हूं'

क्यूटनेस ओव्हरलोडेड असा हा व्हिडिओ चिमुकल्यांमुळे लक्षवेधी ठरत आहे. व्हायरल व्हिडिओ काश्मीरमधला असून,  २ मुली बर्फवृष्टी पडत असल्यामुळे खुश झाल्या आहेत, आणि त्यांनी हा आनंद आपल्या सुंदर शब्दातून व्यक्त केला आहे. त्यातील एक चिमुकली 'तुम्ही पाहू शकता, सुंदर बर्फवृष्टी होत आहे, आणि हे दृश्य पाहून आम्हाला आनंद होत आहे.',  तर व्हिडिमधील दुसरी चिमुकली, 'मला असे वाटते की मी स्वर्गाच्या मध्यभागी उभी आहे, आणि आजूबाजूला दुधाच्या लाटा उसळत आहे.' शिवाय या दोन्ही चिमुकली बर्फासोबत खेळता-खेळता आपल्या लफ्जातून लोकांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहे.

AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओला सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. 'स्लेड्स ऑन स्नो, ऑर शायरी ऑन स्नो, मला तर पर्याय दुसरे वाटते.' दोन्ही मुलींच्या या क्युट रिपोर्टिंगचे कौतुक करताना नेटिझन्स म्हणतात, 'दोघींच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप गोंडस आहेत.' तर दुसऱ्याने 'अरे देवा, किती सुंदर व्हिडिओ आहे. मला हे बघण्यात मजा येत आहे. शेअर करण्यासारखा हा व्हिडिओ आहे'. 

Web Title: Anand Mahindra shares adorable video of 2 girls 'reporting' snowfall in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.