lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित

AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित

Safer internet day 2024 : आपल्या हातात असलेल्या इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करायचा, शिकून घ्या!

By भाग्यश्री कांबळे | Published: February 6, 2024 06:14 PM2024-02-06T18:14:58+5:302024-02-06T18:41:09+5:30

Safer internet day 2024 : आपल्या हातात असलेल्या इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करायचा, शिकून घ्या!

safer internet day 2024 : 6 tips for women to protect from online frauds and tips to stay safe online | AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित

AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित

भाग्यश्री कांबळे

आपण सर्वचजण मोबाईल वापरतो.  हातात स्मार्टफोन, त्यावर इंटरनेट, सतत स्क्रोलिंग, सतत फॉरवर्ड-डाऊनलोड हे आपल्या जगण्याचा भाग झालं आहे. फोन आणि इंटरनेटवजा जगणं उरु नये इतकं शहर ते गावखेड्यात इंटरनेट पोहोचलं. आपल्या मुलभूत गरजांपैकी एक बनलं आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जग जसं आपल्या मुठीत आलं आहे, तसे काही धोकेही वाढले (Internet).

आता तर एआयच्या विश्वात आपण पाऊल ठेवत आहोत. एआयचा वापर असो, किंवा ऑनलाईन फ्रॉड, महिलांचे होणारे बुलिंग, फसवणूक यासाऱ्यापासून महिलांनी सुरक्षित कसे रहायचे?(Safer internet day 2024 : 6 tips for women to protect from online frauds and tips to stay safe online).

६ फेब्रुवारी हा सेफर इंटरनेट डे अर्थात सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा होतो. (safer internet day 2024) इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि महिलांनी आपल्या सुरक्षित वावराविषयी कोणती काळजी घ्यायची याविषयावर लोकमतसखी.कॉमने डिजिटल टास्क फोर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. रोहन न्यायधीश यांच्याशी विशेष संवाद साधला. त्यांनी सांगितलेली ही सूत्रं नक्की लक्षात ठेवायला हवी.

 

महिलांनी इंटरनेटचा वापर करताना कोणती काळजी घ्यायला हवी?- डॉ. रोहन न्यायाधिश सांगतात..

१. बऱ्याच महिला मोबाईल फोनचा वापर करतात. त्यातून सोशल मिडीयावर ॲक्टिव्ह राहणं कॉमन झालं आहे. आपण त्यात फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करतो. पण आता एआय टेक्नोलॉजी  आली आहे, तेव्हापासून डीपफेक सारख्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांनी फोटो अपलोड करताना हाय क्वालिटी फोटो अपलोड करणे टाळावे. कारण हाय क्वालिटीचे फोटो सहजरित्या मॉर्फ करण्यात येतात.

२. बरेच हॅकर महिलांना टार्गेट करतात. जॉब, शॉपिंग, किंवा मॅट्रिमोनियल स्कॅम करून महिलांना जाळ्यात ओढतात. इंटरनेटद्वारे फ्रॉड करून पैसे उकळतात. त्यामुळे कोणतीही अननोन साईट ओपन करताना काळजी घ्यावी.

 

३.  काही महिला 'सगळे जण वापरतात म्हणून मी ही अमुक-तमुक मोबाईल फोन वापरेन', असे म्हणतात. पण त्यातील फिचर्सची गरज खरंच आपल्याला आहे का? त्यातील सिक्युरिटी मोबाईल फोनला सुरक्षित ठेवेल का? यासगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. ॲप्सदेखील डाऊनलोड केल्यानंतर किंवा करण्यापूर्वी त्यातील फिचर्सची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.

सौदी अरेबियात भारतीय लष्करी महिला अधिकारी करणार भारताचे प्रतिनिधित्व, भारतीय महिलांचे अभिमानास्पद काम

४.  'प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर' हे आपण ऐकलंच असेल. आपण कोणत्या गोष्टीत फसणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कोणतेही ॲप वापरताना किंवा पेजवर जाताना आपण अनावश्यक परवानग्या देतो. ते देणे टाळावे. यामुळे आपला डेटा चोरीला जातो, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. शिवाय पासवर्ड हा स्ट्राँग असला पाहिजे.  ठराविक काळानंतर पासवर्ड सातत्याने बदललाही पाहिजे. मुख्य म्हणजे डेटा वापरताना पब्लिक वाय-फाय वापरू नये. यामधून आपला डेटा चोरीला जाऊ शकतो.

५. ऑनलाइन फ्रॉड अनेक प्रकारे केले जातात. जर आपण लॉटरीचं तिकीट विकत घेतलं नसेल आणि तरी कोणी फुकट पैसे इंटरनेटद्वारे देत असेल तर, सावध व्हा.

निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल

६. जे कोण सोशल मिडीयाचा वापर करतात, त्यांना सायबर एथिक्सबद्दल माहिती हवी. सोशल मिडीयावर वावरताना अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. बरेच जण इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणालाही इंटरनेटद्वारे पैसे देताना शहानिश करून पैसे द्या. कारण सोशल मिडीयावर जे दिसतं ते सगळंच खरं नसतं.

Web Title: safer internet day 2024 : 6 tips for women to protect from online frauds and tips to stay safe online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.