Join us

Police Viral Video : रिवॅाल्व्हर घेऊन व्हिडीओ बनवणं चांगलंच अंगाशी आलं; कॉन्स्टेबल प्रियांकाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:29 IST

Agra Police Viral Video : 'प्रियांका मिश्रा अंडर ट्रेनिंग आहे. काही दिवसांपूर्वीच तिला पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळाली. चौकशी होईपर्यंत ती सुट्टीवर आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ बनवण्याचा क्रेझ सध्या सगळ्यांमध्येच दिसून येतो. अनेकदा विरंगुळा म्हणून बनवलेले व्हिडीओ चांगलेच महागात पडतात. आग्रा येथील प्रियांका मिश्रा नावाच्या पोलिस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रिवॉल्व्हर घेऊन व्हिडीओ बनवणं या पोलिस तरूणीच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. या प्रकरणाची दखल घेत एसएसपी मुनिराज यांनी प्रियंका मिश्राची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाचे आदेश दिले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रकरणाचा  सखोल तपास करत आहे. 

रिवॉल्व्हरसह व्हिडीओ बनवला

प्रियांका मिश्रा एमएम गेटवर तैनात होती. त्यावेळी तिनं खाकी वर्दीवर रिवॉल्व्हर घेऊन व्हिडीओ बनवला आणि इंन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. कमरेला रिवॉल्व्हर अडकवून प्रियांका उत्तर प्रदेशबाबत  डायलॉग म्हणत होती. बँकग्राऊंड म्यूझिक सुद्धा सुरू होते. ,''हरियाण, पंजाब तो बेकार ही बदनाम है आओ कभी उत्तर प्रदेश, रंगबाजी हम तुम्हें सिखाते हैं। '' ना गुंडई पर गाना बनाते हैं, ना गाड़ी पर जाट-गुर्जर लिखाते हैं, हमारे यहां पांच-पांच साल के लड़के कट्टा चलाते हैं।' असं या व्हिडीओत प्रियांका म्हणाली. 

काही दिवसांपूर्वी मिळाली होती पोस्टिंग

पोलिस स्टेशनच्या एमएम गेटचे प्रभारी अवधेश अवस्थी सांगतात की, ''प्रियांका मिश्रा अंडर ट्रेनिंग आहे. काही दिवसांपूर्वीच तिला पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळाली. चौकशी होईपर्यंत ती सुट्टीवर राहिल. एसएसपी मुनीराज  यांनी प्रियांकाच्या या व्हिडिओची दखल घेतली आहे. यासह, व्हिडिओसंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे.''

प्रियांकावर होऊ शकते कारवाई

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांकानं या व्हिडीओत ज्या रिवॉल्व्हरचा वापर  केला आहे. त्या रिवॉल्व्हरचीही तपासणी केली जाईल. संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रियांकावर कारवाई होऊ शकते. 

टॅग्स :पोलिससोशल व्हायरलसोशल मीडियाउत्तर प्रदेश