Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > गॅस सिलेंडरजवळ चुकूनही ठेवू नका ५ गोष्टी, स्वयंपाकघरातले स्फोट टाळण्याचे सोपे उपाय

गॅस सिलेंडरजवळ चुकूनही ठेवू नका ५ गोष्टी, स्वयंपाकघरातले स्फोट टाळण्याचे सोपे उपाय

5 things you should never keep near a gas cylinder, simple solutions to avoid explosions in the kitchen : गॅस सिलेंडरजवळ अजिबात ठेवू नका या गोष्टी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 19:03 IST2026-04-08T18:09:58+5:302026-04-08T19:03:52+5:30

5 things you should never keep near a gas cylinder, simple solutions to avoid explosions in the kitchen : गॅस सिलेंडरजवळ अजिबात ठेवू नका या गोष्टी.

5 things you should never keep near a gas cylinder, simple solutions to avoid explosions in the kitchen | गॅस सिलेंडरजवळ चुकूनही ठेवू नका ५ गोष्टी, स्वयंपाकघरातले स्फोट टाळण्याचे सोपे उपाय

गॅस सिलेंडरजवळ चुकूनही ठेवू नका ५ गोष्टी, स्वयंपाकघरातले स्फोट टाळण्याचे सोपे उपाय

स्वयंपाकघरात अनेक वस्तू अशा आहेत ज्या हाताळताना काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः गॅस स्टोव्ह आणि सिलेंडरची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच्या आसपास काही वस्तू ठेवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेक वेळा आपण नकळत अशा गोष्टी गॅसजवळ ठेवतो, ज्या आगीचा प्रसार वाढवू शकतात किंवा स्फोटाचा धोका निर्माण करू शकतात. (5 things you should never keep near a gas cylinder, simple solutions to avoid explosions in the kitchen)त्यामुळे गॅसजवळ काय ठेवू नये याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

सर्वात आधी टाळायला हवी ती म्हणजे सेंट, परफ्युम किंवा डिओडरंटसारखी स्प्रे उत्पादने. या वस्तूंमध्ये ज्वलनशील वायू असतो. गॅस सुरू असताना किंवा अगदी थोड्या उष्णतेतही हे स्प्रे स्फोटक ठरू शकतात. त्यामुळे अशा वस्तू नेहमी गॅसपासून दूर, थंड आणि सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. त्याचप्रमाणे हेअरस्प्रे, रूम फ्रेशनर यांसारखी उत्पादनेही गॅसजवळ ठेवणे टाळावे.

स्वयंपाकघरात प्लास्टिकच्या वस्तू ठेवण्याची सवय अनेकांना असते, पण गॅसजवळ प्लास्टिक ठेवणे धोकादायक आहे. प्लास्टिक पटकन वितळते आणि आग लागल्यास विषारी धूर निर्माण होतो. त्यामुळे प्लास्टिकचे डबे, पिशव्या किंवा इतर साहित्य गॅसपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तसेच कागद, टिश्यू, वर्तमानपत्र यांसारख्या ज्वलनशील वस्तू गॅसजवळ ठेवणे टाळावे, कारण त्या पटकन पेट घेऊ शकतात.

अन्नपदार्थांबाबतही काही काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः तेल, तूप यांसारख्या पदार्थांचे भांडे गॅसजवळ उघडे ठेवणे टाळावे. हे पदार्थ उष्णतेमुळे पटकन तापतात आणि सांडल्यास आग भडकू शकते. तसेच पीठ, साखर किंवा मसाले यांचे उघडे डबे गॅसजवळ ठेवल्यास ते खराब होतात.

कापडाच्या वस्तूही तितक्याच धोकादायक ठरू शकतात. स्वयंपाकघरात वापरले जाणारे टॉवेल, रुमाल, ओढणी किंवा पडदे गॅसजवळ असल्यास ते सहज पेट घेऊ शकतात. अनेक अपघात अशाच छोट्या गोष्टींमुळे घडतात. त्यामुळे कापडाच्या वस्तू नेहमी सुरक्षित अंतरावर ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय केरोसिन, पेंट, थिनर किंवा इतर ज्वलनशील द्रव्ये गॅसजवळ ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. या वस्तूंचा वास आणि वायूही आगीला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अशा वस्तू स्वयंपाकघरापासून दूरच ठेवाव्यात.

एकूणच, गॅस स्टोव्ह आणि सिलेंडरच्या आसपास स्वच्छता आणि सुरक्षित अंतर राखणे हीच सर्वात मोठी काळजी आहे. थोडीशी जागरूकता आणि सवयींमध्ये बदल केल्यास मोठे अपघात सहज टाळता येऊ शकतात. घर सुरक्षित ठेवण्यासाठी या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Web Title : गैस सिलेंडर के पास न रखें ये 5 चीजें: सुरक्षा उपाय।

Web Summary : स्प्रे, प्लास्टिक और कपड़ों जैसी ज्वलनशील वस्तुओं को गैस सिलेंडर से दूर रखकर रसोई में विस्फोट से बचें। तेलों को सावधानी से रखें और एक सुरक्षित, स्वच्छ क्षेत्र बनाए रखें।

Web Title : Keep these 5 things away from the gas cylinder: safety tips.

Web Summary : Avoid kitchen explosions by keeping flammables like sprays, plastics, and cloths away from gas cylinders. Store oils carefully and maintain a safe, clean area.