Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळ्यात रात्री कानाशी डास गुणगुणतात, झोपेचं वाटोळं? एका कांद्याचा करा खास उपाय, डास पळतील

उन्हाळ्यात रात्री कानाशी डास गुणगुणतात, झोपेचं वाटोळं? एका कांद्याचा करा खास उपाय, डास पळतील

1 Onion Tip for Keeping Insects Away Naturally : डासांना पळवून लावणारा कांद्याचा सोपा नैसर्गिक उपाय- केमिकल काॅइल्सची गरजच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 10:00 AM2024-05-24T10:00:45+5:302024-05-24T10:05:01+5:30

1 Onion Tip for Keeping Insects Away Naturally : डासांना पळवून लावणारा कांद्याचा सोपा नैसर्गिक उपाय- केमिकल काॅइल्सची गरजच नाही..

1 Onion Tip for Keeping Insects Away Naturally | उन्हाळ्यात रात्री कानाशी डास गुणगुणतात, झोपेचं वाटोळं? एका कांद्याचा करा खास उपाय, डास पळतील

उन्हाळ्यात रात्री कानाशी डास गुणगुणतात, झोपेचं वाटोळं? एका कांद्याचा करा खास उपाय, डास पळतील

उन्हाळ्यात डास आपल्या भोवती भुणभूणतातच (How to get rid of Mosquitoes). डास चावल्याने होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी डास पळवण्याचे विविध उपाय केले जातात. पण हे उपाय उपयुक्त ठरतीलच असे नाही (Onion). काही डास पळवणाऱ्या काॅइल्समध्ये केमिकल रसायनयुक्त घटक असतात. ज्यामुळे आरोग्याला हानी देखील पोहचू शकते.

जर आपल्याला केमिकल उपायांना गुड बाय करायचं असेल तर, एका कांद्याचा सोपा उपाय करून पाहा. कांद्याच्या वापराने डास घरातून पळून जातील. शिवाय उपाय नैसर्गिक असल्यामुळे, केमिकल गोष्टींचा त्रास शरीराला होणार नाही. जर आपल्याला नैसर्गिक उपायांचा वापर करून डासांना पळवून लावायचं असेल तर, कांद्याचा सोपा उपाय करून पाहा. घरात पुन्हा डास फिरकणारही नाही(1 Onion Tip for Keeping Insects Away Naturally).

कांद्याच्या नैसर्गिक उपायाने पळवून लावा डासांना

नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट

लागणारं साहित्य

कांदा

दालचिनीचं तेल

कापूर

लवंग

अशा पद्धतीने करा डासांना पळवून लावणारं नैसर्गिक उपाय

सर्वप्रथम, कांद्याची साल काढून घ्या. नंतर पीलर घ्या. पीलरच्या मदतीने कांद्याच्या आतील भाग थोडा गोलाकाराने काढून घ्या. नंतर कांदा एका वाटीत ठेवा. 
एका प्लेटमध्ये ३ कापूर आणि ३ लवंगा घ्या, त्याला ठेचून पावडर तयार करा. कांद्यामध्ये एक चमचा दालचिनी तेल घाला. जर घरात दालचिनी तेल उपलब्ध नसेल तर, आपण कोणतंही तेल वापरू शकता.

दिवसा भरपूर पाणी प्या पण रात्री झोपण्यापूर्वी नको, असं का? झोपण्यापूर्वी पाणी कुणी प्यावे, कुणी नाही?

नंतर त्यात पावडर घालून मिक्स करा. एक कापसाची वात तयार करा. वात कांद्यामध्ये ठेवून दिवा लावा. दिवा आपण खिडकीजवळ ठेऊ शकता. कांदा, दालचिनीचं तेल, कापराची पावडर, लवंगाच्या उग्र वासामुळे डास पुन्हा घरात शिरकाव करणार नाही.

Web Title: 1 Onion Tip for Keeping Insects Away Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.