Lokmat Sakhi >Shopping > प्रत्येक घरात असाव्यात या वस्तू, आयुष्य बनेल आरामदायी

प्रत्येक घरात असाव्यात या वस्तू, आयुष्य बनेल आरामदायी

अनेक नामवंत कंपन्यांची विविध प्रकारची उपकरणांची मालिका (अप्लायन्सेस सीरिज्) ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. स्वयंपाकघरात कूकर, तवा, मिक्सर, चाकू या गोष्टी गरजेच्या असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 11:48 AM2023-05-28T11:48:06+5:302023-05-28T14:15:50+5:30

अनेक नामवंत कंपन्यांची विविध प्रकारची उपकरणांची मालिका (अप्लायन्सेस सीरिज्) ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. स्वयंपाकघरात कूकर, तवा, मिक्सर, चाकू या गोष्टी गरजेच्या असतात.

Essential household Items Every Home Should Have | प्रत्येक घरात असाव्यात या वस्तू, आयुष्य बनेल आरामदायी

प्रत्येक घरात असाव्यात या वस्तू, आयुष्य बनेल आरामदायी

स्वयंपाकघर ही आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा असते. आपलं स्वयंपाकघर अतिशय नीटनेटके असावे असे प्रत्येक गृहिणीला वाटत असते. स्वयंपाकखोलीत आणि त्यातूनही विशेषत: भारतीय स्वयंपाकखोलीत एकाच वेळी अनेक प्रकारची कामे सुरू असतात. हृदयाचा मार्ग पोटातून जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे कोणाचेही मन जिंकायचे असेल तर त्याचा आवडीचा एखादा पदार्थ बनवून द्या असे म्हटले जाते.

त्यामुळे तुमच्या घरातील स्वयंपाकघर कुठे असणार, त्यात कोणकोणती भांडी, उपकरणं असणार याचा विचार सगळ्यात पहिल्यांदा केला जातो. केवळ आधुनिक उपकरणांची गर्दी केली म्हणजे झाले मॉडर्न किचन, असे नाही. तर त्यासाठी स्वंयपाकघराची रचना व त्यानुसार आवश्यक त्या उपकरणांची योग्य ती मांडणी लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

घर घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कधीही स्वयंपाकघराचा विचार केला जातो. स्वंयपाकघरात योग्य त्या प्रमाणात उजेड येईल अशी प्रकाशयोजना करावी.  स्वयंपाक घर हे लहान असो वा मोठं, त्यात उगाचच भांड्यांची गर्दी होणार नाही याचा विचार करणे गरजेचे असते. अनेक नामवंत कंपन्यांची विविध प्रकारची उपकरणांची मालिका (अप्लायन्सेस सीरिज्) ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. स्वयंपाकघरात कूकर, तवा, मिक्सर, चाकू या गोष्टी गरजेच्या असतात. तसेच धान्य साठवण्यासाठी विविध प्रकारचे डबे आवश्यक असतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही घरबसल्या ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. तसेच स्वंयकपाक घरातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेगडी.

शेगडी निवडताना तुमचा ओटा कोणत्या आकाराचा आहे याचा जरूर विचार करा. ॲमेझॉनवर मिळणाऱ्या लाईफलाँग एलएलजीएस १० ग्लास टॉप, २ बर्नर मॅन्युअल ग्लास गॅस स्टोव्हला सध्या बाजारात चांगलीच मागणी आहे. ही शेगडी दीर्घकाळ टिकत असल्याने याला लोकांची पसंती मिळत आहे.

उत्तम आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मुळात स्वयंपाक कसा केला जातो हे माहीत असणे गरजेचे आहे. स्वंयपाक करताना अन्न शिजवण्यासोबतच भाज्या कशाप्रकारे चिराव्यात हे देखील महत्त्वाचे असते. भाजी चिरणे ही देखील एक कला आहे असे म्हटले जाते. भाजी चिरण्यासाठी, साल काढण्यासाठी चाकूचा सर्रास वापर केला जातो.

चाकू सोबतच चॉपिंग बोर्ड देखील तितकाच गरजेचा असतो. ॲमेझॉनवर हे कॉम्बिनेशन वाजवी दरात उपलब्ध आहे. पिजिअन बाय स्टोव्हक्राफ्ट किचन टूल्स अँड कटिंग बोर्ड कोम्बो तुम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. हे चाकू दीर्घकाळ टिकण्यासाठी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. कोणतीही वस्तू चिरून झाल्यानंतर चाकू लगेचच स्वच्छ करून ठेवावा. चाकूवर खाद्यपदार्थ दीर्घकाळ चिटकून कधीच ठेवू नका.

स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडी. भांड्यांशिवाय स्वयंपाकघरात कोणतेच काम होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाकघरात कोणकोणती भांडी गरजेची आहेत हे पाहावे. कधीकधी आवश्यक नसलेली भांडी देखील आपण घरात ठेवून उगाचच गर्दी करतो. त्यामुळे आपल्याला आवश्यक लागतील इतकीच भांडी घरात ठेवावीत. त्याने स्वयंपाकघर सुटसुटीत आणि चांगले दिसते. काळानुसार स्वयंपाकघरातील भांडी देखील बदलली आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

पूर्वी घरात लोखंडाची भांडी असायची, त्याची जागा तांब्या आणि पितळेने घेतली आहे. या भांड्याना काही वर्षांनंतर घरातील मंडळी न विसरता कल्हई करून घेत असत. आजही काही घरात आपल्याला पितळ्याची आणि तांब्याची भांडी पाहायला मिळतात. आता त्याची जागा स्टेनलेस स्टील अथवा ॲल्युमिनियअमच्या भांड्यांनी घेतली आहे. पण आता यापेक्षा लोक नॉन स्टीक भांडी घेणे अधिक पसंत करत आहेत.

नॉन स्टीक भांड्याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या भांड्यात जेवण बनवताना तेल हे अतिशय कमी प्रमाणात वापरावे लागते अथवा तुम्ही तेल वापरले नाही तरी चालते. मानवी शरीर जास्त फॅट पचवू शकत नाही. जास्तीचे फॅट आपल्या शरीरात जमा व्हायला सुरुवात होते. यांमुळे हृदयविकार आणि रक्तदाब यांच्यासारख्या आजारांना आमंत्रण मिळतं.

त्यामुळे लोक सध्या आरोग्याच्या दृष्टीने नॉन स्टीक भांड्यांना अधिक पसंती देतात. तसेच नॉन स्टीक भांड्यांमध्ये जेवण बनवल्यास ते चिटकत देखील नाही. डोसा, घावण यांसारखे पदार्थ तर नॉन स्टीक तव्यावर खूपच चांगले बनतात. सध्या ॲमेझॉनवरील पिजन नॉनस्टीक कूकवेअर सेट ऑफ ७ पिसेसला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. तसेच सध्या पाहुणे घरी आल्यानंतर जेवण स्टेनलेस स्टीलच्या ताटात वाढण्याऐवजी डीनर सेटला लोक अधिक प्राधान्य देतात. वेगवेगळ्या प्रकारचे डिनर सेट ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत.

सध्या कामाच्या निमित्ताने अनेकजण दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात लंच बॉक्स आणि पाण्याची बॉटल असणे गरजेचे आहे. घराच्या बाहेर पडताना या दोन्ही गोष्टी घेऊन जायला विसरू नका. कोणत्या प्रकारच्या लंच बॉक्स आणि पाण्याची बॉटलची निवड करायची याविषयी आज आम्ही सांगणार आहोत.

लंच बॉक्स आणि पाण्याची बॉटल

तहान भागवण्यासाठी, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी त्यासोबतच शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स मध्ये ठेवलेले पाणी लवकर गरम होते. हे पाणी प्यायले तर आपली तहान देखील भागत नाही. तसेच थंडीत सर्दी, खोकला होऊ नये यासाठी अनेकवेळा लोक गरम पाणी पिणे पसंत करतात. त्यामुळे बॉटल खरेदी करताना ज्या बॉटलमध्ये थंड पाणी थंडच राहील आणि गरम पाणी गरमच राहील अशा बॉटलला पसंती द्या.

तसेच ज्या डब्यात जेवण गरम राहील आणि त्यातून तेल अजिबात बाहेर येणार नाही अशा डब्यांना प्राधान्य द्यावे. तसेच सध्या पाणी गरम करण्यासाठी किटल वापरणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. असे विविध प्रकारचे किटल, टीफिन आणि बॉटल ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. स्वयंपाकघरात कोणकोणत्या वस्तू असल्या पाहिजेत हे तुम्ही जाणून घेतले. आता त्यानंतर तुमच्या बाथरूमची, कपड्यांची स्वच्छता कशाप्रकारे राखायची याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

बाथरूमची स्वच्छता

आपले घर आणि विशेषतः बाथरूम स्वच्छ असावे यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. आपण कितीही प्रयत्न केले तरी फरशीवरील, बाथरूमच्या टाईल्सवरील, कमोडवरील खूप दिवसांपासून असणारे डाग निघत नाहीत. बाथरूममधील फारशीवर सतत पाणी वापरले जाते त्यामुळे तिथल्या फरशीला डाग पडू शकतात. तुमची फरशी स्वच्छ राहावी यासाठी ॲमेझॉनवरील हार्पिक डिसइन्फेक्ट टॉयलेट क्लिनरचा वापर करावा. तसेच आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. परंतु कित्येकवेळा टॉयलेट-बाथरूम साफ केले तरी त्यातून दुर्गंध येतो. हा दुर्गंध येऊ नये यासाठी ॲमेझॉनवर उपलब्ध असणारे ओडोनिल बाथरूम एअर नक्कीच वापरून पाहा.

कपड्यांची स्वच्छता

नीटनेटकेपणामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसतं. त्यामुळे आपले कपडे आपल्याला शोभून दिसणारे असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. कपडे सतत बाहेर धुवायला दिल्यास आपला खिशा चांगलाच रिकामा होतो. त्यामुळे तुम्ही ॲमेझॉनवर उपलब्ध असणारे सर्फ, एरिअल, टाईड एक्सेल मेटिक पावडर यांसारखे अनेक डिटर्जंट पावडर वापरू शकता. तसेच या डिटर्जंट पावडरमध्ये कपड्यांना सुगंधीत करणारे अनेक डिटर्जंट पावडर देखील उपलब्ध आहेत.

Amazon च्या वेबसाइटवर जाऊन शॉपिंग करण्यासाठी क्लिक करा >>https://www.amazon.in/

 

Web Title: Essential household Items Every Home Should Have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shoppingखरेदी