Lokmat Sakhi >Shopping > 'बॅगी पॅन्ट'ची फॅशन पुन्हा इन! पाहा ३ ट्रेण्डी आणि स्वस्त पर्याय फक्त १००० रुपयांच्या आत

'बॅगी पॅन्ट'ची फॅशन पुन्हा इन! पाहा ३ ट्रेण्डी आणि स्वस्त पर्याय फक्त १००० रुपयांच्या आत

Shopping tips for jeans: स्किनी, टाईट जीन्सला मागे टाकत आहे आता अशा बॅगी पॅन्ट किंवा बॅगी जीन्सची फॅशन... सध्या ट्रेडिंग असलेला हा प्रकार तुम्ही खरेदी केला की नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 03:30 PM2022-01-25T15:30:36+5:302022-02-25T11:01:28+5:30

Shopping tips for jeans: स्किनी, टाईट जीन्सला मागे टाकत आहे आता अशा बॅगी पॅन्ट किंवा बॅगी जीन्सची फॅशन... सध्या ट्रेडिंग असलेला हा प्रकार तुम्ही खरेदी केला की नाही ?

Baggy pant or Baggy jeans fashion is in trend, Must see thee options under 1k | 'बॅगी पॅन्ट'ची फॅशन पुन्हा इन! पाहा ३ ट्रेण्डी आणि स्वस्त पर्याय फक्त १००० रुपयांच्या आत

'बॅगी पॅन्ट'ची फॅशन पुन्हा इन! पाहा ३ ट्रेण्डी आणि स्वस्त पर्याय फक्त १००० रुपयांच्या आत

Highlightsकाही ऑनलाईन साईट्सवर हजार रूपयांच्या आत या पॅण्ट उपलब्ध असून स्वस्तात मस्त खरेदीचा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

फॅशनच्या जगामध्ये झटपट बदल होत असतात.. नवे वर्ष, नवी फॅशन (fashion world) असं या जगाचं गणित... आता हेच बघा ना कोरोना आला, लॉकडाऊन लागलं आणि जीन्सचं मार्केट झपाट्याने खाली आलं... जीन्सचं मार्केट खाली आणणारा हा पहिलाच प्रसंग.. असं होण्याचं कारण सांगताना तज्ज्ञ मंडळी म्हणतात की लॉकडाऊन काळात लोक दिड- दोन महिने घरी होते. त्यामुळे टाईट, घट्ट, जाडेभरडे, टोचके कपडे घालण्याची सवय तुटली. यामुळे मग त्यानंतरही लोकांना टाईट, घट्ट, जाड जीन्स घालणं नकोसं झालं आणि याचा परिणाम जीन्सच्या (latest trend in jeans) खरेदीवर झाला...

 

त्यामुळेच तर हल्ली बॅगी पॅण्ट (baggy pant) नावाच्या मोकळ्या- ढाकळ्या पॅण्टला चांगले दिवस आले आहेत... जीन्स तर घालायची आहे, पण ती घट्ट नको, असा नवा ट्रेण्ड आता जगभरात रुजू पाहतो आहे. तुम्हाला आठवत असेल तर ही फॅशन तब्बल १५- २० वर्षे जुनी आहे. तेव्हा मुलीही अशाच मुलांप्रमाणे ढगळ्या, सैलसर जीन्स घालायच्या. मुलांच्या आणि मुलींच्या जीन्स असा स्पष्ट फरकही तेव्हा लक्षात यायचा नाही. त्यानंतर  मात्र  मुलींच्या जीन्स म्हणजे त्या घट्ट किंवा स्किनी टाईट असणार असं समीकरण झालं होतं.. 

Click to Buyhttps://www.amazon.in/AKA-CHIC-Relaxed-AKCB-1513_Dark/dp/B09B5149LV/

 

टाईट जीन्सची क्रेझ आता मात्र झपाट्याने कमी होत आहे. म्हणूनच तर आता अनेक सेलिब्रिटीही बॅगी डेनिम लूकमध्ये दिसून येत आहेत. आता लवकरच आपल्याकडे उन्हाळा सुरू होणार आहे. उन्हाळ्यात अनेक जणं तसंही प्रचंड उष्णतेमुळे घट्ट जीन्स घालणं टाळतात. अशा सगळ्यांसाठी बॅगी जीन्स हा प्रकार चांगलाच सोयीस्कर ठरणारा आहे. कारण या पॅण्ट खूपच सैलसर आणि मोकळ्या- ढाकळ्या असतात. त्यामुळे गरमीचा त्रास नाही.

Click to Buyhttps://www.myntra.com/jeans/roadster/roadster-women-blue-baggy-fit-high-rise-pure-cotton-jeans/14094244/buy 

 

तुम्हीही जर आता अशी बॅगी जीन्स किंवा बॅगी पॅण्ट खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर हे ऑनलाईन पर्याय नक्कीच ट्राय करून पहा... जीन्स आणि कॉटन या दोन्ही प्रकारात बॅगी पॅण्ट उपलब्ध आहेत. काही ऑनलाईन साईट्सवर (online shopping sites) हजार रूपयांच्या आत या पॅण्ट उपलब्ध असून स्वस्तात मस्त खरेदीचा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या जीन्सविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी किंवा या जीन्स खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघा. 

 

 

Click to Buyhttps://www.flipkart.com/tokyo-talkies-flared-women-light-blue-jeans/p/itm927bd3353af70

 

 

Web Title: Baggy pant or Baggy jeans fashion is in trend, Must see thee options under 1k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.