Lokmat Sakhi >Relationship > पहिल्यांदा डेटवर जातांना मुलांच्या ५ गोष्टी मुली बारकाईने पाहतात.. 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ येतोय, हे लक्षात ठेवा..

पहिल्यांदा डेटवर जातांना मुलांच्या ५ गोष्टी मुली बारकाईने पाहतात.. 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ येतोय, हे लक्षात ठेवा..

Relationship: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डेटवर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर तरूण मुलांनी या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण तुमच्या याच गोष्टींकडे तरूणींचं बारकाईने लक्ष असतं... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 08:45 PM2022-02-01T20:45:31+5:302022-02-01T20:52:22+5:30

Relationship: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डेटवर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर तरूण मुलांनी या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण तुमच्या याच गोष्टींकडे तरूणींचं बारकाईने लक्ष असतं... 

Valentine special: Girls notices these things of boys on their first date | पहिल्यांदा डेटवर जातांना मुलांच्या ५ गोष्टी मुली बारकाईने पाहतात.. 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ येतोय, हे लक्षात ठेवा..

पहिल्यांदा डेटवर जातांना मुलांच्या ५ गोष्टी मुली बारकाईने पाहतात.. 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ येतोय, हे लक्षात ठेवा..

Highlightsतुमच्या दृष्टीने तुमच्यातल्या या काही गोष्टी अगदीच किरकोळ असल्या तरी मुली मात्र त्याच गोष्टी खूप सिरिअसली घेतात आणि त्यावरूनच तुमची पारख करतात...

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या व्हॅलेंटाईनसोबत डेटवर (planning for date) जाण्याचे प्लॅनिंग एव्हाना रंगात आलेलं असेल... कुठे जायचं, जाताना आपलं ड्रेसिंग कसं असावं, याबाबतही वेगवेगळे प्लॅन ठरले असतील.. आपण ज्याच्यासोबत डेटवर जात आहोत, त्याला यावेळी पक्कं इंम्प्रेस करूनच टाकायचं असं दोन्ही पार्टनरकडून ठरविण्यात येतं आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतात.. पण तरूणांनो तुम्ही जर पहिल्यांदा डेटवर जात असाल तर या काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.. कारण तुमच्या दृष्टीने तुमच्यातल्या या काही गोष्टी अगदीच किरकोळ असल्या तरी मुली मात्र त्याच गोष्टी खूप सिरिअसली घेतात आणि त्यावरूनच तुमची पारख करतात...

 

१. तुमचे केस आणि ड्रेसिंग..
बऱ्याचदा डेटवर जायचं म्हटलं की मुलं कोणते कपडे घालायचे, याकडे विशेष लक्ष देतात. कपड्यांची स्टाईल करता करता हेअरस्टाईलला पार विसरूनच जातात. पण मुलींना विस्कटलेल्या केसांचे, वाढलेल्या दाढीमिशा असणारे मुलं अजिबातच आवडत नसतात. त्यामुळे तुमच्या कपड्यांइतकेच महत्त्व तुमच्या केसांनाही द्या.

 

२. तुम्ही कसे आणि किती खाता
तुम्ही डेटवर गेल्यानंतर तुमचे टेबल मॅनर्सही मुलींकडून खूप बारकाईने पाहिले जातात. तुम्ही वेटरशी कसे बोलता आहात इथपासून ते बिल आल्यानंतर तुमचा चेहरा कसा होतो, इथपर्यंत सगळं मुलींच्या नजरेतून व्यवस्थित स्कॅन होत असतं.. त्यामुळे खूप बकाबका, अधाशीसारखं तर मुळीच खाऊ नका.. शिवाय तुम्ही कोणते पदार्थ ऑर्डर करत आहात, यावरूनही मुली बरेच ठोकताळे बांधू शकतात..

 

३. तुम्ही किती फिट आहात..
आपला पार्टनर एकदम फिट असावा, ही कोणत्याही मुलीची अपेक्षा असते.. त्यामुळे तुमची ढेरी सुटली आहे का, तुमचे बायसेप्स कसे आहेत हे बघून मुली तुमचा फिटनेस ओळखू शकतात.. त्यामुळे फिटनेस मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या..

 

४. तुम्ही किती अधीर आहात..
डेटवर गेलं की तरूणांनी सगळ्याच गोष्टींसाठी एकदम अधीर व्हावं, हे मुलींना नको असतं.. त्यांना संयमी, शांत तरूण अधिक भावतो. त्यामुळे तुम्ही तिला भेटायला किती एक्साईट आहात, हे तुमच्या देहबोलीतून, बोलण्यातून नक्कीच जाणवू द्या. पण कुठेही तुमची ओव्हर एक्साईटमेंट दिसू देऊ नका.. 

 

५. तुमचं त्यांच्याशी वागणं..
तुम्ही तुमच्या पार्टनरचं म्हणणं किती ऐकत आहात, तिच्याकडे किती लक्ष देत आहात हे खूप महत्त्वाचं आहे... मुलींना त्यांचं ऐकणारा मुलगा आवडतो. पण अगदीच कोणतंही मत न मांडता नुसता मान डोलावून हो ला हो म्हणणारा मुलगा त्यांना नको असताे. त्यामुळे त्या जे म्हणत आहेत, ते ऐका. त्यांच्या बोलण्याला जरूर किंमत द्या. त्यांच्या मतांचा आदर करा. पण तुमची स्वत:ची इमेज आणि मतं सांभाळा. ते त्यांना जास्त आवडेल. 

 

Web Title: Valentine special: Girls notices these things of boys on their first date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.