Join us

ट्विंकल खन्नाकडून वैवाहिक जीवनातील सत्याचा खुलासा; या दोघांच्या भांडणाचे फोटो पाहून लोक म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:04 IST

Twinkle khanna shared a funny post : पहिल्या फोटोत ट्विंकल-अक्षय प्रेमाने बोलताना दिसत आहेत, परंतु फोटोनुसार त्यांचे भाव बदलतात आणि संभाषण वादात बदलते

सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आपल्या सेंस ऑफ ह्यूमरसाठी ओळखली जाते.  अलिकडेच तिनं सोशल मीडियावर अक्षयसह काही फोटोज शेअर केले आहेत. या माध्यामातून तिनं वैवाहिक आयुष्याचं सत्य सांगण्याचा गमतीदार प्रयत्न केला आहे.  अक्षय आणि ट्विंकल लंडनच्या एक कॅफेमध्ये बसून बोलताना दिसून येत आहेत. 

हे फोटो  शेअर करताना ट्विंकलने लिहिले, "आम्ही दोघं गप्पा मारत असताना काही फोटो क्लिक केले आणि हे फोटो  बहुतेक विवाहित लोकांच्या जीवनाची कहाणी सांगतात." तुम्ही लग्नाच्या वेळी प्रत्येक गोष्ट हसतमुखाने सुरू करता. आणि हळूहळू सर्व काही खाली जाते. खरं तर, पहिल्या फोटोत ट्विंकल-अक्षय प्रेमाने बोलताना दिसत आहेत, परंतु फोटोनुसार त्यांचे भाव बदलतात आणि संभाषण वादात बदलते.

अभिनेत्री हुमा कुरेशीने ट्विंकलच्या पोस्टवर हास्याचे इमोजी शेअर केले. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, शेवटच्या फोटोकडे पाहून ट्विंकल कानाखाली मारणार आहे असं वाटतं. टेनिसपटू महेश भूपतीनेही ट्विंकलच्या पोस्टवर हास्याचे इमोजी शेअर केले आहे.  'या' कारणामुळे कमी होतोय लैगिंक जीवनातील रस; सुखी वैवाहीक जीवनासाठी वेळीच माहीत करून घ्या

ट्विंकल आणि अक्षय सध्या लंडनमध्ये आहेत. वास्तविक, या दिवसांमध्ये अक्षय लंडनमध्ये सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अलीकडेच, अक्षय त्याची आई अरुणा भाटियांचा मृत्यू झाल्यानं दोन दिवसांसाठी भारतात आला होता. निर्मात्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तो अंत्यविधीला उपस्थित राहिल्यानंतर लगेच लंडनला परतला. अलीकडेच अक्षयचा बेलबॉटम हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं तो चांगलाच चर्चेत आहे.  फिटनेस फ्रिक आहे शिखर धवनची ४० वर्षीय पूर्व पत्नी; जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं सिक्रेट

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपसोशल व्हायरलट्विंकल खन्नाअक्षय कुमार