lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > जोडप्यांच्या नात्यात आनंद कायम टिकून राहण्याची ही महत्त्वाची कारणे...

जोडप्यांच्या नात्यात आनंद कायम टिकून राहण्याची ही महत्त्वाची कारणे...

Sexual health Tips :माहामारीमुळे लोकांमध्ये ताण तणावाचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी सेक्स लाईफवर याचा प्रभाव दिसून येतो. अशा स्थितीत चांगल्या सेक्स लाईफची सुरूवात कशी करता येईल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 04:13 PM2021-06-04T16:13:37+5:302021-06-04T16:27:41+5:30

Sexual health Tips :माहामारीमुळे लोकांमध्ये ताण तणावाचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी सेक्स लाईफवर याचा प्रभाव दिसून येतो. अशा स्थितीत चांगल्या सेक्स लाईफची सुरूवात कशी करता येईल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

Sexual health Tips : Sex relationship having sex once in a week strengthen a relationship | जोडप्यांच्या नात्यात आनंद कायम टिकून राहण्याची ही महत्त्वाची कारणे...

जोडप्यांच्या नात्यात आनंद कायम टिकून राहण्याची ही महत्त्वाची कारणे...

Highlightsकपल्स आपल्या लैंगिक जीवनात येत असलेल्या बाधा आणि तणावाला दूर करू शकतात. खासकरून जेव्हा ते पालक बनण्याचा विचार करतात. 

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा परिणाम लोकांच्या शरीरावरच नाही तर मानसिक स्थितीवरही झालेला दिसून येत आहे. यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये ताण तणावाची स्थिती उद्भवताना दिसून येतेय. इतकंच नाही तर सेक्स लाईफमध्ये बराच बदल झालेला दिसून येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीमुळे लोकांमध्ये ताण तणावाचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी सेक्स लाईफवर याचा प्रभाव दिसून येतो. अशा स्थितीत चांगल्या सेक्स लाईफची सुरूवात कशी करता येईल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

एक्सपर्ट्सनी दिलल्या माहितीनुसार पार्टनर्सनी एक चांगल्या संतुष्ट सेक्स लाईफची सुरूवात करताना आठवड्यातून एकदा शरीरसंबंध नक्कीच ठेवायला हवेत. अमेरिकन एसोसिएशन ऑफ मॅरिज एँड फॅमिली थेरेपिस्ट्सचे सेक्स थेरेपिस्ट इयान केर्नरनं दिलेल्या माहितीनुसार आठवड्यातून एकदा शरीरसंबंध ठेवणारे लोक आपल्या नात्याबाबत जास्त आनंदी असतात. 

एका पॉडकास्टदरम्यान तज्ज्ञ केर्नर यांनी प्रेग्नेटईशच्या फाऊंडर एंड्रिया सिरता यांच्यासह सेक्स आणि रिलेशनशिप या विषयावर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी सांगितलं की, कपल्स आपल्या लैंगिक जीवनात येत असलेल्या बाधा आणि तणावाला दूर करू शकतात. खासकरून जेव्हा ते पालक बनण्याचा विचार करतात. 

सोशल साइकोलॉजी एंड पर्सनॅलिटी साइंस नावाच्या पत्रकात समोर आलेल्या माहितीनुसार जी जोडपी आठवड्यातून एक शरीरसंबंध ठेवतात असे लोक शरीर संबंध ठेवत नसलेल्यांच्या तुलनेत अधिक संतुष्ट असतात. याशिवाय आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा शरीरसंबंध ठेवल्यानं कोणताही खास परिणाम दिसून येत नाही. 

कर्नर यांनी सांगितले की, ''शरीरसंबंध तीन विभागात मोडला जातो. पहिल्या प्रकारात मनोरंजनासाठी शरीरसंबंध ठेवले. दुसरं म्हणजे प्रजनन , फॅमिली प्लॅनिंगसाठी संबंध ठेवले जातात. तर तिसऱ्या प्रकारात पूर्णपणे शरीरसंबंधांवर फोकस केला जातो. अनेकदा कपल्समध्ये ताण तणावाची स्थिती येऊ शकते.  हळूहळू यौन इच्छा कमी होऊ लागते.'' 

कर्नर यांनी उदाहरण देताना सांगितले की, त्यांनी असेही कपल्स पाहिले आहेत. ज्यांनी गर्भधारणेसाठी आयवीएफचा आधार घेतला आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्याचा सगळ्यात जास्त परिणाम त्यांच्या यौन संबंधावर पडला. यादरम्यान अनेक कपल्सच्या शरीर संबंधात कमतरता आढळून आली. सेक्स फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी नसून नातं टिकवून ठेवण्यासाठीही महत्वाचा असते याचा अनेक कपल्सचा विसर पडला होता. 

कर्नर यांनी अलिकडेच ''टेल मी अबाउट द लास्ट टाइम यू हॅड सेक्स" या नावाचं पुस्तक लिहिलं आहे.  यात त्यांनी म्हटलंय की कपल्समध्ये शारीरिक संबंध व्हायलाच हवेत. असं केल्यानं ताण तणाव कमी होण्यास मदत होते.  शरीरसंबंधांसाठी एक शेड्यूल तयार केलेलं असावं. कोणावरही दबाब टाकून संबंध ठेवू नयेत. जोडप्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं जेव्हा शरीर संबंध सातत्यानं होत असतात. 
 

Web Title: Sexual health Tips : Sex relationship having sex once in a week strengthen a relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.