lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > Sexual Harassment : संजनासारखा तुम्हाला ऑफिसमध्ये ‘तसला’ त्रास होतोय का? अशावेळी काय कराल; ५ गोष्टी लक्षात ठेवा

Sexual Harassment : संजनासारखा तुम्हाला ऑफिसमध्ये ‘तसला’ त्रास होतोय का? अशावेळी काय कराल; ५ गोष्टी लक्षात ठेवा

Sexual Harassment in the Workplace : त्रास सहन करणं किंवा नोकरी सोडणं हा उपाय नाही, सेक्शुअल हॅरासमेण्टसंदर्भात तक्रार करण्याचे मार्ग आहेत..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:37 PM2021-09-28T18:37:06+5:302021-09-28T18:50:40+5:30

Sexual Harassment in the Workplace : त्रास सहन करणं किंवा नोकरी सोडणं हा उपाय नाही, सेक्शुअल हॅरासमेण्टसंदर्भात तक्रार करण्याचे मार्ग आहेत..

Sexual Harassment in the Workplace : How to Deal With Sexual Harassment in the Workplace | Sexual Harassment : संजनासारखा तुम्हाला ऑफिसमध्ये ‘तसला’ त्रास होतोय का? अशावेळी काय कराल; ५ गोष्टी लक्षात ठेवा

Sexual Harassment : संजनासारखा तुम्हाला ऑफिसमध्ये ‘तसला’ त्रास होतोय का? अशावेळी काय कराल; ५ गोष्टी लक्षात ठेवा

Highlightsवैयक्तिकरित्या लैंगिक छळाची तक्रार करणे ठीक आहे, परंतु आपण नेहमी औपचारिक ईमेल किंवा पत्राद्वारे पाठपुरावा केला पाहिजे.आधीच कामाचा व्याप, वैयक्तिक आयुष्यातील समस्या , नोकरीची गरज यामुळे खूप मानसिक ताण येतो कधी नोकरी सोडण्यचाही वेळ येते. मात्र चुकीच्या वागण्याची तक्रार केली  जात नाही.

अरुंधती संजनाला विचारते एरव्ही ती ‘स्वतंत्र’ स्त्री म्हणून फिरतेस, आणि आता ऑफिसमध्ये कुणी तुझ्याकडे ‘तसल्या’ नजरेनं पाहत काही डिमांड्स करतो तर तू नोकरी सोडून देणार? त्याला धडा नाही शिकवणार? त्याला धडा शिकव, गप्प बसू नकोस.. आई कुठे काय करते या मालिकेतला हा संवाद. मालिकेची नायिका अरूंधती संजनाला सांगते, ''स्त्रीकडे वाईट नजरेनं बघणारा पुरूष मग तो कोणीही असो त्याला त्याची जागा दाखवायलाच हवी आणि ही हिंमत त्या बाईनं करायला हवी.'' बॉसच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडल्यानं तिचंच कसं नुकसान होऊ शकतं हे पटवून देते. 
मालिकेच्या निमित्तानं हा विषय सध्या चर्चेत असला तरी सेक्शुअल हॅरासमेण्ट इन ऑफिस हा विषय काही तसा नवीन नाही.

रोज असंख्य तरुणी/महिला कामासाठी घराबाहेर अशात अनेकदा ऑफिसमधील वातावरण किंवा एखाद्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यामुळे नसता मन:स्ताप सहन करावा लागू शकतो. काही गोष्टी मुलींच्या बाबतीत अशा घडतात ज्या त्या चारचौघात बोलू शकत नाही. आधीच कामाचा व्याप, वैयक्तिक आयुष्यातील समस्या , नोकरीची गरज यामुळे खूप मानसिक ताण येतो कधी नोकरी सोडण्यचाही वेळ येते. मात्र चुकीच्या वागण्याची तक्रार केली  जात नाही. आपल्याकडे ‘मी टू’ चळवळ गाजली तेव्हा अनेकजणी तक्रार करत पुढे आल्या होत्या.

शासनाने विशाखा कमिटी कार्यालयांत महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि छळाच्या तक्रारनिवारण्यासाठी सक्तीची केली.
मात्र तरीही ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीकडून अशा प्रकारचा त्रास होत असेल तर काही गोष्टी माहीत करून घ्याव्यात, जेणेकरून तुम्ही या स्थितीला तोंड देऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम करत असलेली कोणत्याही वयोगटातील लैंगिक त्रासानं पीडित झालेली महिला अशी तक्रार करू शकते. तर घरकाम काम करणाऱ्या पीडित महिलादेखील तक्रार करू शकतात.

१)सगळ्यात आधी तुमच्यासह जे काही होतंय तो लैगिंग त्रास आहे की नाही हे ठरवा

लैंगिक छळाबद्दल एचआरकडे तक्रार करण्यासाठी कारवाई करण्यापूर्वी, आपल्याल होणारा त्रास लैगिंग छळात मोडतो का, हे समजून घ्या मग तक्रार करा. कोणीही व्यक्ती तुमच्या संमतीने तुमच्याशी बोलताना विनोद करू शकते. तुमची मस्करी करू शकते. पण संमती नसताना विचित्र विनोदांसह, शारीरिक स्पर्श केला जात असेल, विचित्र हावभाव, दृश्य दाखवणे हे लैगिंक त्रासात मोडते.

२) तक्रार केल्यानंतर नोकरी धोक्यात येण्याचा विचार करू नका.

कायद्यानुसार ज्या संस्थेत दहापेक्षा जास्त कर्मचारी आहेत अशा संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्याचे अध्यक्ष एक वरिष्ठ पद असणारी महिला असावी. त्यात 50% सदस्य महिला असाव्यात. एक सदस्य स्वयंसेवी संस्थेची महिला कर्मचारी असावी. येथे कोणतीही महिला कर्मचारी शोषणाची तक्रार करू शकते. जर संस्थेकडे ही समिती नसेल, तर जिल्हा स्तरावर गठित स्थानिक तक्रार समितीकडे तक्रार देता येईल. किंवा तुम्ही स्थानिक पोलिसांकडे तक्रार करू शकता. यानंतर, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर समिती निर्णय घेते. आपण दुसऱ्या कर्मचाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप लावता तेव्हा आपली संस्था योग्य प्रतिसाद देईल यावर विश्वास ठेवा.

२) तुमच्या ऑफिसची याबाबत पॉलिसी काय आहे ते समजून घ्या

विशाखा कायद्यानुसार प्रत्येक कंपनीत विशाखा समितीची स्थापना झालेली असते. या समितीकडे महिला यासंदर्भातील तक्रार करून आपल्या समस्या निवारण करू शकतात महिलांचे नोकरी-व्यवसायाचे ठिकाण सुरक्षित असावे. अशा कामाच्या ठिकाणी महिलांचे कुठल्याही प्रकारचे लैंगिक शोषण होऊ नये आणि झाल्यास त्याबाबत प्रक्रिया आणि उपाययोजना यात नमूद केल्या आहेत.

१) शारीरिक घाणेरडे इशारे

२) लैगिंग सुखाची मागणी

३)लैंगिकतापूर्ण टोमणे, विनोद

४) अश्लील गोष्टी दाखवणे,

५) शाब्दिक, अशाब्दिक लैंगिक कृती यांचा यात समावेश आहे.

४) तक्रार कशी कराल?

वैयक्तिकरित्या लैंगिक छळाची तक्रार करणे ठीक आहे, परंतु आपण नेहमी औपचारिक ईमेल किंवा पत्राद्वारे पाठपुरावा केला पाहिजे. पत्रात खालील माहिती असावी. विषयात ही ओळ वापरा, "लैंगिक छळाची औपचारिक तक्रार." हे कंपनीला लक्षात आणून देते की आपण फक्त असभ्य टिप्पणी किंवा त्रासदायक सहकाऱ्याबद्दल तक्रार करत नाही.

तर ही एक गंभीर तक्रार आहे ज्यावर कारवाईची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नावं, तारखा आणि कृतींसह एक टाइमलाइन. तपास सुरू असताना तुम्ही साक्षीदारांची यादी करू शकता. कधी, कुठे, कसा परिणाम झाला याचा तपशील द्यावा. तुमचं काम किंवा पगारवाढ कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असल्यास तेही नमुद करा.

५) तुमचा स्वतःचा वकील नेमण्याची गरज आहे का ते ठरवा

जर तुम्हाला तुमच्या संस्थेची तुमच्या लैंगिक छळाच्या तक्रारीच्या हाताळणीबद्दल काळजी वाटत असेल. तर तुम्ही एखाद्या वकीलाशी संपर्क साधू शकता. कायदेशीर मदत घेऊ शकता.

Web Title: Sexual Harassment in the Workplace : How to Deal With Sexual Harassment in the Workplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.