lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > ऑफिसमध्ये 'कुणीतरी' जाम आवडू लागलंय? पण ते नुसतं आकर्षण की प्रेम, कसं ओळखाल...

ऑफिसमध्ये 'कुणीतरी' जाम आवडू लागलंय? पण ते नुसतं आकर्षण की प्रेम, कसं ओळखाल...

Relationship Tips How deal with an office crush : सुदैवानं आपण सगळे आजकाल सोशल मीडियावर असतो. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्याबाबत माहिती मिळवण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:21 PM2021-06-16T17:21:16+5:302021-06-16T19:11:16+5:30

Relationship Tips How deal with an office crush : सुदैवानं आपण सगळे आजकाल सोशल मीडियावर असतो. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्याबाबत माहिती मिळवण्यास मदत होते.

Relationship Tips : 10 ways to deal with an office crush | ऑफिसमध्ये 'कुणीतरी' जाम आवडू लागलंय? पण ते नुसतं आकर्षण की प्रेम, कसं ओळखाल...

ऑफिसमध्ये 'कुणीतरी' जाम आवडू लागलंय? पण ते नुसतं आकर्षण की प्रेम, कसं ओळखाल...

Highlightsऑफिसमधलं कुणीही आपल्याला आवडतं यात काहीही चूक नाही. आपण त्या व्यक्तीस आठवड्यातून पाच ते सहा दिवस भेटता आणि बराच वेळ एकत्र घालवता. म्हणून विचार न करता मनातील गोष्ट सांगण्याची घाई करू नका. दुपारचे जेवण एकत्र केल्याने ऑफिसमधील सहकार्‍यांची जवळीक वाढते. त्या काळात ते ऑफिसच्या पॉलिटिक्सपासून ते कामापर्यंत आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या सर्व गोष्टींवर चर्चा करतात.

सगळेच नोकरी करणारे लोक जास्तीत जास्तवेळ ऑफिसमध्ये असतात. दिवसातील ८  तास जरी गृहीत धरले तरी जवळपास ५ दिवस काम केल्यानंतर व्यक्ती ४० तास ऑफिसमध्ये घालवते. अनेकदा ऑफिसमधील सोबत काम करणारी मुलगा किंवा मुलगी आवडू लागते. अशा स्थितीत तुम्ही काय करायला हवं जेणेकरून तुमची आवडती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल  तसंच कोणत्या गोष्टी माहिती असायला हव्यात. याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.  

१) या क्षणांचाही आनंद घ्या 

तुम्ही ऑफिस क्रशकडून काहीही मिळवणार नसाल तरीही आपण या भावनांचा आनंद घेऊ शकता. गेल्या काही दिवसांत आपल्या ड्रेसिंगमध्ये बरेच बदल झाले आहेत हे आपल्या लक्षात येईल. तुम्ही मिटिंगमध्येही जास्त उठून एक्टिव्ह आणि आकर्षक दिसाल कारण तुम्हाला कोणाला तरी इम्प्रेस करायचं आहे. तुमची क्रश रिलेशनशिपमध्ये राहील की नाही याबाबत तुम्हाला कल्पना नसेल, पण या क्षणाचा आनंद घ्या आणि इन्जॉय करा.

२) हलकी फुलकी फ्लर्टिंग करू शकता

जर आपल्या ऑफिसचा क्रश सिंगल असेल  तर, त्याच्याबरोबर लाईट फ्लर्टिंग देखील केले जाऊ शकते. या सहज फ्लर्टिंगमुळे कोणालाही त्रास होणार नाही. जेव्हा आपण त्याला किंवा तिला वॉटर कूलर किंवा कॉफी मशीनजवळ भेटाल तेव्हा बोलण्याचा प्रयत्न नक्की करा. यामुळे किमान तुमच्यात चांगली मैत्री राहिल.

३) क्रशचा कोणी पार्टनर आहे की नाही  हे माहित करून घ्या

सुदैवानं आपण सगळे आजकाल सोशल मीडियावर असतो. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्याबाबत माहिती मिळवण्यास मदत होते. एखाद्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला आपल्याला आता जास्तवेळ लागत नाही. पण जर ती किंवा तो कमिटेड असेल तर संधी घेऊ नका. कारण यातून तुम्हाला काही मिळणार नाही. उलट मैत्री तुटण्याचा धोका असेल. जर तो किंवा ती कमिटेड नसेल तर आपण चान्स घेऊ शकता, परंतु जास्त अपेक्षा न करणे चांगले.

४) याबाबत आपल्या सहकाऱ्यांना काहीच सांगू नका

ऑफिसमधील आपल्या चांगल्या मित्रांना आपल्या क्रशबद्दल सांगवंस वाटत असेल तरीही स्वत: वर कंट्रोल ठेवा आणि कोणालाही सांगणं टाळा. जर आपण असं केलं तर  तर आपल्याला फायदा होईल की नाही हे आपल्याला माहिती नाही, परंतु नुकसान निश्चितच होईल. म्हणूनच अशा फिलिंग्स मनातच ठेवणं चांगलं ठरेल. 

५) ऑफिस ग्रुपसह बाहेर जाऊ शकता

आपल्या ऑफिस क्रशसह आपल्याला एकांतात वेळ घालवायचा असेल, परंतु थेट तसे करणे व्यावहारिक ठरणार नाही. आपण किमान ऑफिस ग्रुपसोबत बाहेर जाऊ शकता. असे केल्याने दोघांनाही बोलण्याची संधी मिळेल आणि असेही होऊ शकते की पुढील ट्रिपला तुम्ही  दोघंच जाल.

६) आपल्या भावना व्यक्त करण्याची घाई नको

ऑफिसमधलं कुणीतरी आपल्याला आवडतं यात काहीही चूक नाही. आपण त्या व्यक्तीस आठवड्यातून पाच ते सहा दिवस भेटता आणि बराच वेळ एकत्र घालवता. म्हणून विचार न करता मनातील गोष्ट सांगण्याची घाई करू नका. थोडा वेळ घेऊन कृती करा.

७) एकत्र जेवणासाठी जाऊ शकता

दुपारचे जेवण एकत्र केल्याने ऑफिसमधील सहकार्‍यांची जवळीक वाढते. त्या वेळात ते ऑफिसच्या पॉलिटिक्सपासून ते कामापर्यंत आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या सर्व गोष्टींवर चर्चा करतात. म्हणूनच दुपारच्या जेवणासाठी आपल्या क्रशसह जा. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यास मदत होईल. कधी कधी तुम्ही लंचसाठी बाहेरही जाऊ शकता.

८) लक्षात घ्या आकर्षण काही वेळासाठीच असते

जर तुम्हाला ऑफिसमधील कलिगबाबत आकर्षण वाटत असेल पण  तुम्हाल दोघांचे पुढील काहीच भविष्य  नसेल तर नाराज होऊ नका. कारण आकर्षण हे काहीवेळासाठीच असते. दिवसेंदिवस हे आकर्षण कमी होऊ शकतो म्हणूनच मनावर आणि हृदयावर कोणत्याही गोष्टीचा ताण येऊ देऊ नका.

९) स्वतःला  गिल्टी ठरवू नका

आपण आपल्या कलिगकडे आकर्षित आहात. पण यामुळे तुम्ही स्वतःला दोष देत असाल तर ते आधी थांबवा. कारण तुम्ही जाणून बुजून तुमच्या पार्टनरला फसवत नाही आहात. जोपर्यंत आपण हे आकर्षण व्यक्त करीत नाही किंवा पार्टनरशी असलेल्या आपल्या नातेसंबंधावर याचा परिणाम होत नाही. तोपर्यंत आपल्याला  दु:खी होण्याची आवश्यकता नाही. 

१०) आकर्षण वाटणं यात काहीच वाईट नाही

तुम्हाला  माहित असते की या आकर्षणाचे कोणतेत भविष्य नाही, परंतु तरीही आपण आपल्या क्रशबद्दल विविध प्रकारे कल्पना करत राहता. यात काहीही चुकीचं नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. काळाबरोबर आपण कल्पनारम्य जगातून बाहेर पडता आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते करता. 

Web Title: Relationship Tips : 10 ways to deal with an office crush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.