lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

International Friendship Day : फ्रेण्डशिप डे स्पेशल : अभिज्ञा भावेशी खास गप्पा, जगण्याला बळ देणाऱ्या मैत्रीची गोष्ट.

By भाग्यश्री कांबळे | Published: August 4, 2023 06:32 PM2023-08-04T18:32:38+5:302023-08-04T18:50:54+5:30

International Friendship Day : फ्रेण्डशिप डे स्पेशल : अभिज्ञा भावेशी खास गप्पा, जगण्याला बळ देणाऱ्या मैत्रीची गोष्ट.

International Friendship Day : Marathi Actress Abhidnya Bhave shares a special friendship story, full of hope, joy and togetherness | अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

भाग्यश्री कांबळे

जेव्हा अवघड दिवस माझी परीक्षा पाहत होते तेव्हा माझ्या मैत्रिणींनी आणि आमच्या मैत्रीनं मला खूप बळ दिलं असं म्हणत अभिज्ञा भावे सांगते, तिच्या ४ मैत्रीणींची खास गोष्ट. येत्या फ्रेण्डशिप डे निमित्त ‘लोकमत सखी’ने अभिज्ञा भावेशी गप्पा मारल्या. मैत्री, त्यातला संवाद, सोबत आणि त्यातून मिळणारी उमेद हे सारं अभिज्ञा सांगत असते. आणि उलगडते त्या ४ मैत्रिणींची गोष्ट!

अभिज्ञा भावेशी झालेली ही मैत्रीपूर्ण प्रश्नोत्तरे..

मुलींची मैत्री.. कशी असते, किती खास असते?

अभिज्ञा भावे : मुलं शक्यतो सगळ्या गोष्टी शेअर करत नाही. पण मुलींमध्ये इगो प्रॉब्लेम नसतो, असे मला वाटते. मुली मैत्रिणींशी चर्चा करतात, गुजगोष्टी शेअर करतात. मुलींची इच्छा असते, की आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं, भावना समजून घ्याव्या. व या सगळ्या गोष्टी मुलींच्या मैत्रीमध्ये दिसून येते. प्रत्येक टप्प्यात माझी कोण न कोण तरी मैत्रीण झाली आहे. माझ्या प्रत्येक मैत्रिणींसोबत आजही मी संपर्कात आहे. सध्या माझ्या अत्यंत जवळच्या ४ मैत्रिणी आहेत. अनुजा साठे, रेश्मा शिंदे, मयुरी देशमुख, श्रेया बुगडे. आम्ही सगळ्या एकाच इंडस्ट्रीत काम करतो. सोबत असतो एकमेकींच्या..

त्वचेचा नैसर्गिक ग्लो हरवलाय? चेहऱ्यावर व्हिटामिन ई कॅप्सूल लावून पाहा, मग पाहा जादू..

एकाच व्यवसायात, त्यातही ग्लॅमरस इंडस्ट्रीत अशी निखळ मैत्री होते का? ती कशी पक्की होत जाते?

अभिज्ञा भावे : मैत्रीमध्ये खरेपणा हवा, मग तुमचं प्रोफेशन कोणतंही असो. प्रत्येक टप्प्यात जर मैत्री आपण पुढे ठेवली, मैत्रीला खास महत्त्व दिलं तर, नक्कीच मैत्री आणखी बहरते. जर आपल्याला कोणी मैत्री किंवा प्रोफेशन निवडायला सांगितलं तर मैत्री आधी निवडा. यामुळे मैत्री तर खरी टिकतेच, यासह घट्ट बॉण्ड तयार होतो. कारण प्रोफेशन हे आपल्या मेहनतीवर आहे. तर मैत्री आपला स्वभाव, आपण त्या व्यक्तीला किती महत्त्व देत आहोत यावर डिपेंड आहे.

१ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग

मैत्री नक्की काय देते, सुरक्षितता-आधार-बळ?

अभिज्ञा भावे : माझ्या मते, मैत्री मला बळ देते. माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग आलेत, सध्या आहेत आणि येतीलही. या प्रसंगात खंबीरपपणे लढायला मला बळ मैत्रीकडून मिळते. अनकेदा आपण दुविधेत असतो, मनस्थिती अशी असते की निर्णय घेता येत नाही. अशा वेळी मैत्री आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचं उत्तम मार्गदर्शन करते.

Web Title: International Friendship Day : Marathi Actress Abhidnya Bhave shares a special friendship story, full of hope, joy and togetherness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.