lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग

१ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग

4 Benefits And Ways Of Applying Ghee For Face चमचाभर तूप महागड्या अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा जास्त असरदार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 07:00 PM2023-07-21T19:00:18+5:302023-07-21T19:01:08+5:30

4 Benefits And Ways Of Applying Ghee For Face चमचाभर तूप महागड्या अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा जास्त असरदार आहे.

4 Benefits And Ways Of Applying Ghee For Face | १ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग

१ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग

'खा तूप येईल रूप', ही म्हण आपण ऐकलीच असेल. तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण कधी चेहऱ्यावर तूप लावण्याचे फायदे ऐकले आहे का? त्वचेवर तूप लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्वचेवर आपण फेस पॅक, लिप बाम, हँड क्रीम, मॉइश्चरायझर आणि बॉडी स्क्रब म्हणून याचा वापर करू शकता.

तुपातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात आणि आर्द्रता बंद करून पोत सुधारतात. तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असते, जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. सौंदर्य वाढवण्यासाठी तुपाचा वापर कसे करावे? चेहऱ्यावर तूप लावण्याची योग्य पद्धत कोणती हे पाहूयात(4 Benefits And Ways Of Applying Ghee For Face).

लिप बाम

अनेकदा ओठांची त्वचा खूप कोरडी होते. ज्यामुळे ओठ फुटू लागतात. व ओठ काळपट पडू लागतात. अशा स्थितीत आपण ओठांवर लिप बाम म्हणून तुपाचा वापर करू शकता. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे तूप ओठांवर लावा. त्यानंतर काही मिनिटे बोटाने ओठांना मसाज करा. रात्रभर ओठांवर तूप तसेच ठेऊन द्या, सकाळी पाण्याने ओठ धुवा. काही दिवसात ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

वाढ खुंटली, केस प्रचंड गळतात? घरीच करा कलोंजी - मेथी दाण्यांचं हेअर ग्रोथ ऑईल, केस भरभर वाढतील

बॉडी स्क्रब

शरीराची त्वचा चमकदार - कोमल बनवण्यासाठी आपण तुपाचा बॉडी स्क्रब म्हणून वापर करू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा तूप, एक चमचा बेसन, २ चमचे दूध घेऊन मिक्स करा. ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावा, व हलक्या हातांनी मसाज करा. १५ मिनिटानंतर आंघोळ करा.

फेस मास्क

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, तुपाचा वापर करा. यासाठी एका वाटीत २ चमचे तूप, २ चमचे बेसन, चिमुटभर हळद घेऊन मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा.

पावसाळ्यात चिखलांतून वाट काढताना पाय काळवंडले? ४ घरगुती उपाय- पाय दिसतील स्वच्छ

मॉइश्चरायजर

त्वचा कोमल मुलायम राहावी यासाठी तुपाचा मॉइश्चरायजर म्हणून वापर करा. यासाठी एका वाटीत तूप घ्या, त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर व हाता - पायांवर लावा. दोन ते तीन मिनिटे मसाज करा. त्यानंतर पाण्याने त्वचा धुवा.

Web Title: 4 Benefits And Ways Of Applying Ghee For Face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.