lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो..

Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो..

Hire My Hubby घर किंवा वस्तू नाही, महिला चक्क नवऱ्यालाच देते रेंटने, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 05:21 PM2022-06-29T17:21:18+5:302022-06-29T17:30:46+5:30

Hire My Hubby घर किंवा वस्तू नाही, महिला चक्क नवऱ्यालाच देते रेंटने, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य...

Hire My Hubby! - Husband renting wife; He also does advertisements, he does his housework very well. | Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो..

Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो..

Highlightsलॉराच्या तीन मुलांपैकी दोन मुले ऑटीस्टीक असल्याने तिला घरातील गोष्टींसाठी नवऱ्याची मदत गरजेची होती. त्यामुळे जेम्स याने आपला ज़ॉब सोडला.नवऱ्याच्या क्रिएटीव्हीटीचा चांगला उपयोग व्हावा यासाठी बायकोने लढवली अनोखी शक्कल

आपला महिन्याचा खर्च भागवण्यासाठी कधी आपण एखादी नोकरी करतो तर कधी बिझनेस. जितके जास्त पैसे कमवता येतील तितका आपण प्रयत्न करत असतो. पण पैसे मिळवण्यासाठी आपल्या नवऱ्यालाच रेंटवर देणारी महिला तुम्ही क्वचितच पाहिली असेल. ब्रिटनमध्ये एक महिला आपल्या पतीला इतर महिलांना रेंटवर देते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जाहिरात देत या महिलेने आपल्या नवऱ्याला रेंटवर द्यायचे असल्याचे सांगितले. या महिलेचे नाव लॉरी यंग असून तिला ३ मुले आहेत. Hire my handy hubby अशी जाहिरात करुन लॉरा आपला पती रेंटने यायला तयार असल्याचे सांगत आहे. लॉराचा पती जेम्स याच्याकडे अशी अनेक स्कील्स आहेत ज्याने तो घराचा कोपरा न कोपरा अतिशय सुंदर बनवतो. 

(Image : Google)
(Image : Google)

आपल्या पतीकडे असलेल्या या कलेच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळावे या उद्देशाने लॉराने ही अनोखी शक्कल लढवली आणि पती रेंटवर उपलब्ध असल्याचे जाहीर केले. जेम्स घरात इतक्या सुंदर वस्तू बनवतो की त्याच्याकडे असलेल्या कलेसाठी लोक त्याला रेंटवर घेतील. फर्निचर, सजावटीच्या वस्तू, गार्डनिंग अशा सगळ्याच गोष्टींची त्याला मनापासून आवड आहे. लॉराने यासाठी Rent My Handy Husband अशी वेबसाईट बनवली आहे. फेसबुक आणि नेक्स्ट डोअर अॅपच्या माध्यमातून तिने याचे प्रमोशन केले आहे. जेम्स २ वर्षापूर्वी वेअरहाऊसमध्ये काम करत होता. ल़ॉराच्या या नव्या प्रोजेक्टचे काही जण कौतुक करत आहेत आणि जवळपासच्या भागात हा प्रोजेक्ट लोकप्रियही झाला आहे. 

ही आगळीवेगळी संकल्पना लोकांना आवडत असून घरातील लहान-मोठी कामे करण्यासाठी माणसे मिळणे अनेकदा अवघड असते. पण जेम्स घरातील गोष्टी बसवण्यात, दुरुस्ती करण्यात, त्या योग्य पद्धतीने लावण्यात अतिशय परफेक्ट असल्याने तो हे काम चांगल्या पद्धतीने करु शकतो. अनेकदा आपण आपल्या नवऱ्याला घरातले एखादे काम करायला सांगतो पण काही ना काही कारणे काढून आपला नवरा ही कामं करायचं टाळत असतो, अशावेळी बाहेरच्या कोणी येऊन ते काम आपल्याला पटकन करुन दिले तर आपल्या सोयीचे होते. याच विचारातून मी माझ्या नवऱ्याकडे असलेली स्कील्स लक्षात घेऊन हा अनोखा बिझनेस सुरू केला आहे असे लॉरा म्हणाली. 

(Image : Google)
(Image : Google)

जेम्सला वेअरहाऊसमध्ये नाईट शिफ्टला काम करावे लागत होते. पण लॉराच्या तीन मुलांपैकी दोन मुले ऑटीस्टीक असल्याने तिला घरातील गोष्टींसाठी नवऱ्याची मदत गरजेची होती. त्यामुळे जेम्स याने आपला ज़ॉब सोडला. नवीन कामासाठी जेम्स किती चार्जेस घेईल याबद्दलही लॉराने सांगितले असून ते साधारणपणे ३५ डॉलर असतील. कोणतेही काम लहान नसून प्रत्येक कामासाठी काही ना काही स्कील लागते तसेच आम्हाला लोकांशी प्रामाणिक राहायचे आहे त्यामुळे आम्ही दर अतिशय कमी ठेवला असल्याचेही ती म्हणते. अपंग किंवा वयाने जास्त असणार्या व्यक्तींसाठी हा दर आम्ही आणखी कमी करु असेही ती म्हणाली. 

 

Web Title: Hire My Hubby! - Husband renting wife; He also does advertisements, he does his housework very well.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.