रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; दुप्पट वजन कमी होईल, स्लिम-ट्रिम दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 08:30 IST
1 / 10वजन (Weight Loss) कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात काही सोपे बदल केल्यास तुमचं काम सोपं होऊ शकतं. आहारात डाळी, कडधान्ये, पनीर, दही यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रथिनांमुळे पोट जास्त काळ भरल्यासारखं वाटतं. (Make These Changes In Your Lunch Weight Will Loose Faster)2 / 10जेवणात भरपूर प्रमाणात काकडी, टोमॅटो, कांदा यांसारखे सॅलेड आणि हिरव्या पालेभाज्या असाव्यात. यात कॅलरीज कमी आणि फायबर्स जास्त असतात.3 / 10संपूर्ण धान्य जसं की ब्राऊन राईस, बाजरी, ज्वारी किंवा ओट्स या पदार्थांचा आहारात समावेश करा हे पचनास मदत करतात आणि भूक नियंत्रणात ठेवतात.4 / 10स्वयंपाकात तेलाचा किंवा तुपाचा मर्यादित ठेवा. तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा.5 / 10भात किंवा चपातीची संख्या कमी करा त्याऐवजी भाज्या व प्रथिनांचे प्रमाण वाढवा.6 / 10साखर नसलेले लिंबूपाणी, ताक किंवा साधे पाणी प्या, कोल्ड्रिक्स किंवा गोड ज्यूस पिणं टाळा.7 / 10तुमच्या जेवणाच्या थाळीचा आकार कमी करा. हळू हळू खाल्ल्यास पोट लवकर भरल्याची जाणीव होते.8 / 10दुपारच्या जेवणात हेवी पदार्थ न घेता कमी तेलकट पण पोटभरीच्या पदार्थांचा समावेश करा.9 / 10दुपारच्या जेवणानंतर लगेच गोड पदार्थ किंवा जंक फूड खाणं टाळा.10 / 10दररोज एकाचवेळी दुपारचे जेवण जेवा. जेवणापूर्वी आणि जेवणादरम्यान पुरेसं पाणी प्या.