रात्री जेवण झाल्यावर या ८ गोष्टी करा, जीमला न जाता झरझर उतरेल चरबी; सुडौल-बारीक दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:44 IST
1 / 8वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाबाबत आणि सवयींबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी करावे. जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. (Do These 8 Thing After Dinner To Lose Weight)2 / 8 रात्रीच्या आहारात मूग डाळीची खिचडी, सूप किंवा भाज्यांचे प्रमाण जास्त असावे आणि कार्ब्स कमी असावेत. (Weight Loss Diet)3 / 8 आहारात पनीर, डाळी किंवा अंड्यांचा पांढरा भाग यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा. ज्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं.4 / 8वणादरम्यान जास्त पाणी पिऊ नये. जेवणाआधी अर्धा तास किंवा जेवणआनंतर अर्ध्या तासानं पाणी प्यावे.5 / 8रात्रीच्या जेवणात मीठ कमी वापरा आणि साखरेच्या पदार्थांपासून लांब राहा कारण यामुळे शरीरात पाणी साचून राहते.6 / 8 जेवण झाल्यावर लगेच झोपण्याऐवजी १० ते १५ मिनिटं संथ गतीनं चाला. जेवताना मोबाईल किंवा टिव्ही पाहू नये यामुळे आफण गरजेपेक्षा जास्त जेवतो.7 / 8पचनशक्ती सुधारण्यासाठी जेवणानंतर ५ ते १० मिनिटं संथ गतीनं चाला. वल्यानंतर बेडवर लगेच आडवे पडू नका. यामुळे एसिडीटी किंवा छातीत जळजळ वाढते.8 / 8रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात जिरं किंवा बडिशेप घालून प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. वेळेवर झोपणं महत्वाचं आहे कारण अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणारे हॉर्मोन्स वाढतात आणि वजनही वाढते.