Join us   

९९ टक्के लोकांना माहीत असते पाणी पिण्याची योग्य पद्धत; या पद्धतीने पाणी प्या- मेंटेन राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 6:28 PM

1 / 7
असं म्हटलं जातं की सर्दी खोकला झाल्यानंतर थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो. जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांना गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाणी प्यायल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात.
2 / 7
गरम पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला होत नाही आणि सायनसचा त्रासही उद्भवत नाही. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. जास्त गरम पाणी प्याययल्याने शरीराचे नुकसानही होऊ शकते. शरीरासाठी किती डिग्री तापमानातले पाणी प्यावे हे समजून घेणं महत्वाचे आहे.
3 / 7
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की गरम पाणी पिण्याऐजवी हलकं कोमट पाणी प्यायवे. ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात याऊलट जर बॉडी टेंम्परेचरपेक्षा जास्त गरम पाणी प्यायलात तर तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. जास्त पाणी प्यायल्याने जिभेची टेस्ट खराब होऊ शकते.
4 / 7
नर्व्हज खराब होण्याची रिस्क असते. गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्मवरही चुकीचा परिणाम होतो. ब्लॉटींग, गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.
5 / 7
डॉक्टर सांगतात बॉडी टेंपरेचरप्रमाणे गरम पाणी प्यावं. बॉडी टेम्परेचर ९८.४ डिग्री असते. शरीराच्या आतील टेंम्परेचर कमी जास्त होत असते.
6 / 7
जर तुम्ही जास्त गरम पाणी प्यायलात तर शरीरातील आतलं तापमान कमी करण्यासाठी मेहनत करावी लागेल. तापमान ५ डिग्रीपेक्षा कमी आणि ५० डिग्रीपेक्षा जास्त असू नये.
7 / 7
हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते गरम पाण्याचे तापमान १५ ते ३५ डिग्री सेल्सियस असल्यास उत्तम मानले जाते.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य