1 / 8भात आवडीचा असेल तर पूर्णपणे सोडण्याची काही गरज नाही. योग्य पद्धतीनं खाल्ल्यास वजन कमी करणं शक्य आहे. (How To Consume Rice For Weight Lose)2 / 8 पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस किंवा हात सडीच्या तांदळाचा वापर करा. कारण त्यात फायबर जास्त असते.3 / 8 एकावेळी खूप भात खाण्याऐवजी फक्त एक छोटी वाटी भात खाण्याची सवय लावा.4 / 8 भातासोबत भरपूर प्रमाणात डाळी, कडधान्य किंवा पालेभाज्या खा. जेणेकरून तुमचं पोट लवकर भरेल.5 / 8तांदूळ प्रेशर कुकरमध्ये शिजवण्याऐवजी पाण्यात उकळवून शिजवा. यामुळे त्यातील अतिरिक्त पिष्टमय पदार्थ कमी होतात.6 / 8शक्यतो दुपारच्या जेवणात भात खा आणि रात्रीच्यावेळी हलका आहार घ्या.7 / 8भात शिजवताना त्यात वरून मीठ घालणं टाळा. कारण मीठामुळे शरीरात पाणी साठून राहते.8 / 8 भात खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 15 ते 20 मिनिटं चाला.ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होतं.