Join us

म्हणून जपानी लोक कायम दिसतात सडपातळ! पाहा, त्यांच्या ४ सोप्या सुटसुटीत सवयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 10:08 IST

1 / 7
'जपान' हा देश जगातील सर्वात निरोगी देशांपैकी एक मानला जातो. जपानमधील लोक फिट अँड फाईन असतात, सोबतच ते तितकेच सडपातळ देखील असतात. जपानी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांचे लाईफस्टाईल ज्यामुळे त्यांची तंदुरुस्ती टिकून राहतेच, शिवाय दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य राखण्यासही मदत होते(Learn These 4 Eating Habits From Japanese People For Weight Loss).
2 / 7
असे असले तरी जपानी लोकांना हे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य अगदी झटपट किंवा अचानकपणे मिळत नाही, त्यामागे त्यांच्या शिस्तबद्ध आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा (4 Japanese eating habits one should adopt to never gain excess weight) मोठा वाटा असतो, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी या त्यांच्या फिट अँड फाईन असण्याचे खरे सिक्रेट आहे.
3 / 7
जपानी लोक फक्त पौष्टिक अन्न खाण्यावर भर देत नाहीत, तर कसे खावे ( 4 things to borrow from Japanese culture to never get fat) आणि किती खावे यावरही विशेष लक्ष देतात. याशिवाय, ते अन्न सावकाश आणि मन लावून खातात, ज्यामुळे पचन नीट होतं आणि शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही. जपानी लोक वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी नेमक्या कोणत्या खाण्याच्या सवयींचं पालन करतात ते पाहूयात.
4 / 7
जपानी लोक त्यांच्या आहारात फर्मेंटेड फूड्स (आंबवलेल्या अन्नपदार्थांना) विशेष महत्त्व देतात. हे पदार्थ केवळ चविष्टच नसून, आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर मानले जातात. आंबवलेल्या अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारे प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेसाठी उपयुक्त असतात आणि पोटातील गुड बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते, सूज आणि गॅसची समस्या कमी होते आणि शरीराची रोग प्रतिकारकशक्ती बळकट होते.
5 / 7
जपानी लोक जेवताना 'हरा हाची बु' हा नियम पाळतात. या नियमानुसार, तुमचे पोट ८० % भरलेले असावे आणि त्यावर जास्त प्रमाणांत खाऊ नये. यामुळे पचन सुधारते आणि जास्त खाणे टाळता येते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. हा साधा पण फायदेशीर नियम त्यांना ओव्हरईटिंगपासून वाचवतो आणि शरीरावर अतिरिक्त ताण न येता वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. या सवयीमुळे त्यांचे वजन न वाढता ते कायम सडपातळ राहतात.
6 / 7
जपानी लोक त्यांच्या आहारात ताजं आणि ऋतूनुसार मिळणारे सिझनल अन्नपदार्थ खाण्यावर अधिक भर देतात. त्यांना प्रोसेस्ड किंवा पॅकेजिंग केलेल्या अन्नपदार्थांपेक्षा नैसर्गिक आणि ताजे पदार्थ खाणे अधिक पसंत करतात. या सवयीमुळे त्यांना अन्नपदार्थांतून आवश्यक ते संपूर्ण पोषण मिळते, कारण सीझनल फळं-भाज्यांमध्ये त्या ऋतूसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्यं आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारतं आणि शरीर निरोगी राहतं.
7 / 7
जपानी लोक त्यांच्या रोजच्या आहारात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचं योग्य प्रमाण राखतात. त्यांचा आहार हा अत्यंत संतुलित आणि पोषणमूल्यांनी भरलेला असतो. जपानी जेवणामध्ये सामान्यतः ताज्या भाज्या, भात, सूप यांचा समावेश असतो. हे सर्व घटक शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवतात. अशा संतुलित आहारामुळे शरीराचं पोषण पूर्ण होतं, पचन व्यवस्थित राहतं आणि वजनही नियंत्रणात राहतं.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सजपान