By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:41 IST
1 / 7मांड्यांच्या आतील बाजूची चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची सांगड घालणं खूपच गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला खालील टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. (7 Easy Ways To Reduce Inner Thigh Fat)2 / 7इनर थाईससाठी सुमो स्वाट्स, साईड लंजेस आणि लेग सर्कल्स हे व्यायाम अत्यंत प्रभावी ठरतात. यामुळे तिथल्या स्नायूंना चांगला ताण मिळतो. (How To Lose Inner Thigh Fat)3 / 7 केवळ विशिष्ट भागाचा व्यायाम करून चरबी कमी होत नाही. त्यासाठी संपूर्ण शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे.. रोज ३० मिनिटं वेगानं चाला, सायकलिंग किंवा पोहणं यामुळे कॅलरजी वेगानं जळतात.4 / 7सीझर किक्स, आणि थाय लिफ्टस यांसारखे पायलेट्स व्यायाम स्नासूंना टोन करण्यासाठी उत्तम आहेत.5 / 7 आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवा आणि साखर, तळलेले पदार्थ तसंच मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळा.6 / 7दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतील आणि चयापचन क्रिया सुधारेल.7 / 7दिवसातून किमान ३ ते ४ आठवडे नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. या टिप्स किंवा वर्कआऊट प्लॅन तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.