पोट-मांड्यांची चरबी कमीच होत नाही? नाश्त्याला हे पदार्थ खा, मेणासारखी वितळेल चरबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 21:04 IST
1 / 7वजन कमी करण्यासाठी तुमचा सकाळचा नाश्ता प्रथिनं आणि तंतूमय पदार्थ खाणं खूप महत्वाचं आहे. कारण यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं आणि वारंवार भूक लागत नाही. (Breakfast Items For Weight Loss)2 / 7नाश्त्यासाठी ओट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. ते फायबर्सनी समृद्ध असल्यानं पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझ्म चांगला राहतो.3 / 7पोहे किंवा उपमा हे पदार्थ कमी कॅलरीजचे असून त्यात भरपूर भाज्या घालून त्याचे पोषण मुल्य वाढवता येतात.4 / 7मूग डाळीत प्रोटीन आणि फायबर्सचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 5 / 7बेरीज, सफरचंद यांसारखी फळं दह्यासोबत किंवा स्मूदीच्या स्वरूपात घेतल्यास आवश्यक जीवनसत्वे मिळतात.6 / 7विविध धान्यांपासून केलेले थालिपीठ हा एक पौष्टीक आणि पोट भरणारा पांरपारीक पर्याय आहे.7 / 7नाश्त्यात साखर किंवा तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळा आणि पाण्याची पातळी चांगली ठेवा. योग्य नाश्ता तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतो आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करतो.