1 / 8निरोगी आयुष्य जगायचं असेल तर वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी. विशेषत: महिलांनी वेगवेगळे आजार टाळण्यासाठी आणि फिटनेस जपण्यासाठी आहारात काही पदार्थ आवर्जून घ्यायला हवे.2 / 8त्यापैकीच एक आहे वेगवेगळे पदार्थ भिजत घालून तयार केलेलं पाणी. ते पाणी नेमकं कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं ते पाहूया..3 / 8आठवड्यातून एकदा मेथ्याचं पाणी प्यायला हवं. यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात १ चमचा मेथ्या भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून प्या. यामुळे पोट साफ होते आणि त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही हे पाणी फायदेशीर ठरते. 4 / 8बाॅडी डिटॉक्स करण्यासाठी धन्याचं पाणी पिणंही खूप फायद्याचं ठरतं. धन्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शिवाय रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासही मदत होते.5 / 8जिऱ्याचं पाणीही आठवड्यातून एकदा प्या. या पाण्यामुळेही पचनक्रिया चांगली होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते.6 / 8रात्री १ ग्लास पाण्यात ५ ते ६ लवंग भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी प्या. यामुळे श्वसनमार्ग मोकळा राहातो. इम्युनिटी वाढते आणि तोंडाचे वेगवेगळे आजारही कमी होतात.7 / 8चिया सीड्स भिजत घातलेलं पाणी रोज सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास त्वचा हायड्रेटेड राहाते. हाडांसाठीही ते फायदेशीर असतं. हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं.8 / 8ज्यांना पचन, पोट फुगणे, ॲसिडीटी असा त्रास असतो त्यांच्यासाठी बडिशेपेचे पाणी पिणं फायद्याचं ठरतं. हा उपाय फिटनेस ट्रेनरने glow_fit_mom या इंस्टाग्राम पेजवर सुचवला आहे.