Join us

फक्त १ चमचा खोबऱ्याची चटणी रोज जेवणात खा- मिळतील ७ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2025 15:33 IST

1 / 10
खोबऱ्याची चटणी... ती तर काय नेहमीचीच.. असं म्हणत आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि घरात असली तरी कधी कधी ती खाण्याचा कंटाळा करतो..
2 / 10
पण एकदा खोबऱ्याची चटणी खाण्याचे हे फायदे जर तुम्ही वाचले तर अगदी आजपासूनच नियमितपणे खोबऱ्याची चटणी किंवा नुसतं खोबरं तरी रोज अगदी आवर्जून खाल..
3 / 10
खोबऱ्याचे ८ ते १० पातळ काप रोज खाणं किती गरजेचं आहे याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी nutritioncharcha या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की चटणी करून खा, लाडू करून खा किंवा नुसतं खोबरं खा.. ते आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे तुम्हाला कोणकाेणते फायदे मिळू शकतात ते पाहा..
4 / 10
खोबरं नियमितपणे खाण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे हार्मोनल हेल्थ सुधारते. अनेक जणांना हार्मोन्सचे संतुलन बिघडण्याचा त्रास होतो. त्यांच्यासाठी दररोज खोबरं खाणं फायद्याचं ठरू शकतं.
5 / 10
खोबऱ्यामध्ये हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहे.
6 / 10
खोबऱ्यामध्ये असणाऱ्या काही पौष्टिक घटकांमुळे त्वचेवर छान ग्लो येतो.
7 / 10
लोह, कॉपर, मॅग्नेशियम खोबऱ्यामधून भरपूर प्रमाणात मिळतात.
8 / 10
केस गळत असतील, केसांची वाढ होत नसेल तरी देखील खोबरं खाणं फायद्याचं ठरू शकतं.
9 / 10
रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही खोबरं खाणं महत्त्वाचं आहे.
10 / 10
पचनाशी संबंधित वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठीही खोबऱ्याचा खूप उपयोग होतो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नत्वचेची काळजीकेसांची काळजी