Join us

जपानी लोकांच्या या ८ सवयींमुळे राहतात कायम सडपातळ! काय आहे त्यांचा फिटनेस फंडा, पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 21:35 IST

1 / 10
लठ्ठपणा - जाडेपणा सर्वात कमी प्रमाणांत (8 Japanese Weight Loss Tips) असलेला देश म्हणून जापानला ओळखले जाते. जपानमधील लोक फिट अँड फाईन असतात, सोबतच ते तितकेच सडपातळ (Follow These Tips From Japanese To Never Get Fat) देखील असतात. जपानी लोकांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचे लाईफस्टाईल ज्यामुळे त्यांची तंदुरुस्ती टिकून राहतेच, शिवाय दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य राखण्यासही मदत होते.
2 / 10
जर तुम्हालाही लठ्ठपणापासून दूर राहायचे असेल, तर तुम्ही जपानी संस्कृतीतून (8 things to borrow from Japanese culture to never get fat) काही खास गोष्टी शिकू शकता, ज्यामुळे तुम्ही निरोगी आणि अ‍ॅक्टिव्ह राहाल.
3 / 10
जपानी लोक जेवताना 'हरा हाची बु' हा नियम पाळतात. या नियमानुसार, तुमचे पोट ८० % भरलेले असावे आणि त्यावर जास्त प्रमाणांत खाऊ नये. यामुळे पचन सुधारते आणि जास्त खाणे टाळता येते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
4 / 10
जपानी लोक स्वतःचे वजन नियंत्रित करण्यासाठी कायम संतुलित आहारच घेतात. हिरव्या पालेभाज्या, सोया उत्पादने, तांदूळ आणि ग्रीन टी हे जपानी आहाराचे प्रमुख भाग आहेत. त्यांच्या अन्नात कॅलरीज कमी आणि पौष्टिकता भरपूर असते, ज्यामुळे वजन वाढत नाही, परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीर निरोगी राहते.
5 / 10
जपानी लोक प्रक्रिया केलेले किंवा जंक फूड खाणे संपूर्णपणे टाळतात. त्यांच्या आहारात ते नेहमी ताजे व नैसर्गिक पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात. ताजी फळे, भाज्या आणि आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात, जे चयापचय वाढवण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करतात.
6 / 10
जपानी लोक अन्नपदार्थ किंवा जेवण जेवण्यासाठी नेहमी आकाराने लहान असणाऱ्या प्लेट्सचाच वापर करतात. परिणामी, आपोआप त्यांच्याकडून कमी प्रमाणात खाल्ले जाते. यामुळे अन्नाचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते आणि कॅलरीजचे प्रमाण कमी होते.
7 / 10
जपानमध्ये ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायली जाते. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि ते चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस गती देतात, त्यामुळे वजनवाढ न होता आपले वजन कायम नियंत्रणातच राहते.
8 / 10
जपानी लोक दैनंदिन कामांसाठी कार किंवा सायकली कमी वापरतात. याउलट ते पायी चालण्याचा उत्तम पर्याय निवडतात. यामुळे त्यांची तंदुरुस्ती राखली जाते आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत करते.
9 / 10
ताणतणाव हे देखील वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. जपानी लोक मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेडिटेशन, गार्डनिंग आणि बाहेरील वातावरणात फिरून स्वतःवरील ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
10 / 10
जपानी लोक रात्री उशिरा जेवणे टाळतात आणि त्यांचे जेवण हलके आणि लवकर असते, ज्यामुळे त्यांचे पचन चांगले होते आणि शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स