Join us

रोज जीम-कडक डाएट करुनही वजन कमी होत नाही? तज्ज्ञ सांगतात, ४ चुका टाळा- तरच झरझर उतरेल वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2025 14:39 IST

1 / 6
काही जण असे असतात जे नियमितपणे व्यायाम करतात. खाण्यापिण्याची पथ्यही पाळतात पण तरीही त्यांचं वजन उतरत नाही.
2 / 6
तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर पुढे सांगितलेली काही पथ्ये पाळा, यामुळे वजन कमी होण्यासाठी निश्चितच प्रयत्न होईल असं तज्ज्ञ सांगतात.
3 / 6
पहिली गोष्ट म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्या. अनेक जण खूप कमी पाणी पितात. पाणी भरपूर प्रमाणात प्यायल्यामुळे पचनक्रिया चांगली होते. बॉडी डिटॉक्स होते. शरीरातले विषारी पदार्थ शरीराबाहेर निघून जातात.
4 / 6
काही तेलामध्ये आणि तुपामध्ये गुड फॅट भरपूर प्रमाणात असतात, असं म्हणून अनेकजण काही तेलकट, तुपकट पदार्थ भरपूर प्रमाणात खातात. हे खाणं टाळायला हवं.
5 / 6
वेटलॉस करायचं असेल तर फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या आहारातलं फायबरचं प्रमाण वाढवा.
6 / 6
शरीरातल्या प्रोटीनच्या कमतरतेकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या. आहारातलं प्रोटीन्सचं प्रमाणही वाढवा. शरीरात पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स गेले तर वजन कमी होण्यास निश्चितच मदत होते.
टॅग्स : वेट लॉस टिप्सपाणीआरोग्यहेल्थ टिप्स