Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पहाडी मुलगी ते पंगा क्विन, कोट्यधीश झालेल्या स्मॉल टाऊन कंगणा रणोटचे ‘डेअरिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 16:12 IST

1 / 8
बॉलिवूडची पंगा क्विन कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे. कंगना कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. कधी दिग्दर्शक, कधी स्टारकिड्स तर कधी राजकारणी सगळेच कंगनाच्या निशाण्यावर असतात.
2 / 8
. याव्यतिरिक्त कंगना आपल्या अफेअर्समुळेही चर्चेत होती. कंगनाचं नाव आत्तापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्यांसह जोडलं गेलं आणि त्याच्या नात्याचं पुढे काय झालं ते पाहूया.
3 / 8
कंगनाचं पहिलं वादग्रस्त अफेअर आदित्य पंचोलीसह होतं. ज्यावेळी कंगना बॉलिवूड इंडस्ट्रीत सुरूवातीच्या स्टेजवर होती तेव्हा तीचं नाव या अभिनेत्यासह जोडण्यात आलं होतं. आदित्य कंगनापेक्षा २० वर्षांनी मोठा असून त्यानं जरीना वहाबशी लग्न केलं होतं.
4 / 8
रिपोर्टनुसार आदित्यनं कंगनाला एक घर गिफ्ट दिलं होतं. त्या ठिकाणी ते भेटायचे. कालांतरानं ब्रेकअप झाल्यानंतर कंगनानं आदित्यवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप लावला.
5 / 8
अभिनेते शेअर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याचं नावही कंगनासोबत जोडण्यात आलं. पण हे नातं जास्त दिवस टिकलं नाही. रिपोर्टनुसार अध्ययनच्या वडीलांना वाटत होतं की त्यानं करिअरकडे लक्ष द्यावं. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या.
6 / 8
क्रिश या चित्रपटात कंगना आणि हृतिक एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले. पण कंगनाने हृतिक आणि ती रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. कंगनाने सांगितले की, तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते आणि तिला लग्न करायचे होते. तर हृतिकने या गोष्टीचे खंडन केले. कोर्टाची नोटीसही कंगनाला पाठवण्यात आली होती.
7 / 8
कंगना रणौत आणि अजय देवगण यांनी वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतरही दोघे एकत्र दिसायला लागले. पण विवाहित अजय देवगण या नात्यापासून दुरावले. कंगनाने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे चुकून एका विवाहित पुरुषासोबत संबंध आले होते.
8 / 8
कंगनाचे नाव ब्रिटनमधील डॉक्टर निकोलस लाफर्टी यांच्याशीही जोडले गेले होते. दोघेही एकत्र स्पॉट होऊ लागले. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये तिने उघड केले की ती एका 28 वर्षीय पुरुषाला डेट करत आहे. पण त्यांचे नातेही फार काळ टिकू शकले नाही आणि ब्रेकअप झाले.
टॅग्स : कंगना राणौतबॉलिवूडरिलेशनशिपरिलेशनशिप