फुग्याच्या ब्लाऊजची जोरदार फॅशन, आता नव्या साडीवर शिवा पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज-पाहा १० स्टायलिश सुंदर पॅटर्न
Updated:January 20, 2026 19:14 IST2026-01-20T18:40:21+5:302026-01-20T19:14:00+5:30
Puff Sleeves Blouse Pattern : सण-समारंभ किंवा लग्नसराईसाठी हे उत्तम फॅशन स्टेटमेंट ठरत आहे.

पफ स्लिव्हज म्हणजे फुग्यांच्या बाह्यांची फॅशन १९७० ते ८० च्या दशकात लोकप्रिय होती. जी आता अधुनिक टचसह पुन्हा परतली आहे. (Puff Sleeves Blouse designs)
सध्या एल्बो लेंथ शॉर्ट पफ आणि बलून स्लिव्हज असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. (10 Blouse Designs)
ही डिझाईन केवळ ब्लाऊजपुरीत मर्यादीत न राहता आता कुर्ती, टॉप, वन-पीस ड्रेस अगदी गाऊनमध्येसुद्धा वापरली जात आहे.
पैठणी किंवा काठपदर साडीच्या ब्लाऊजला फुगा बाही शिवल्यास त्याला एक रॉयल आणि पारंपारीक लूक मिळतो.
पफचा आकार उठावदार दिसण्यासाठी ऑर्गेंझा, नेट, सिल्क किंवा ब्रॉकेट अशा कडक फॅब्रिकचा वापर केला जातो.
या बाह्यांमुळे खांदे आणि हाताच्या वरचा भाग अधिक उठावदार दिसतो. ज्यामुळे सडपातळ महिलांना एक भरलेला आणि आकर्षक लूक मिळतो.
सध्या बाहीच्या वरच्या बाजूला मनगटापाशी चुणका असलेल्या गोपी बाही किंवा चंद्रमुखी बाहीला खूप मागणी आहे.
सण-समारंभ किंवा लग्नसराईसाठी हे उत्तम फॅशन स्टेटमेंट ठरत आहे.
हे दिसायला जितके ट्रेंडी आहे तितकेच ते आरामदायी असते.
साधी साडी असो की पार्टी वेअरसाठी कोणत्याही साडीवर तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलचे पफ स्लिव्हज शिवून घेऊ शकता.