Join us

फक्त कॅटविक नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी निवडला स्वत: पेक्षा लहान असलेला जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:39 IST

1 / 7
प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं आणि प्रेमाला सीमा नसते. प्रेम ही एक शाश्वत भावना आहे. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कतरिना तिच्यापेक्षा (Katrina) पाच वर्षांनी लहान अभिनेता विक्कीसोबत लग्नाच्या तयारीत आहे. फक्त कतरिनाच नाही तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत लग्नगाठ बांधली आहे. अशाच काही हटके बॉलिवूड जोडप्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 7
फराह खान शिरीष कुंदरला मैं हूं ना च्या सेटवर भेटली, या दोघांच्याही वयात आठ वर्षांचे अंतर आहे. या जोडप्याला अन्या, दिवा नावाच्या २ मुली आणि एक मुलगा आहे.
3 / 7
बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान तिच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान असलेल्या कुणाल खेमूच्या प्रेमात पडली. त्यांनी 2014 मध्ये पॅरिसमध्ये लग्न केले आणि 25 जानेवारी 2015 रोजी मुंबईत लग्न केले. अलीकडेच हे जोडपे लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. सोहानं आपल्या लेकीसोबत वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
4 / 7
शिल्पा आणि राजचा प्रवास हा वाद आणि अडथळ्यांनी भरलेल्या बॉलिवूड चित्रपटातील एखाद्या दृश्यापेक्षा कमी नाही. ते बिझनेस मीटिंगमध्ये भेटले, जिथे राज तिच्या परफ्यूम ब्रँड S2 च्या जाहिरातीसाठी तिला मदत करत होता. त्यावेळी तिने यासंबंधांबाबत नकार दिला. पण नंतर तिनं कबूल केले की,मी कुणाला तरी डेट करत आहे. 2009 मध्ये या दोघांचे लग्न झाले.
5 / 7
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा पती निक जोनासपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी, प्रियांका आणि निक यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री निकसोबत तिच्या वयातील अंतराची प्रत्येक थट्टा सकारात्मकतेने घेते.
6 / 7
मॉडेल, मिस इंडिया, अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केले, जो तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे, ती आता दोन मुलांची आई आहे, गौतम गट्टामनेनी आणि सितारा.
7 / 7
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी मणिरत्नम्स गुरूच्या निर्मितीदरम्यान डेटिंग सुरू केल्याची अफवा पसरली होती. 2007 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली आणि तेव्हापासून ही एक परीकथा बनली आहे, ब्यूटी क्वीन आणि मिस वर्ल्ड, ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत फ्रेंच शहरातील 70 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर तिच्या लूकने थक्क केले.
टॅग्स : सेलिब्रिटीबॉलिवूडकतरिना कैफविकी कौशल