By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:32 IST
1 / 8माणसं ओळखणं ही एक कला आहे. जी अनुभवाने आणि निरिक्षणानं विकसित होते. एखादी व्यक्ती मनातून कशी आहे हे समजून घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. (How to decide If Person Is Good Or Bad)2 / 8माणूस काय बोलतो त्यापेक्षा तो इतरांशी कसा वागतो स्वत:पेक्षा खालच्या स्तरावरील लोकांशी कसा वागतो यावरून त्याचा स्वभाव कळतो. (What Does It Mean To Be a Good Person)3 / 8कठीण काळात किंवा वादाच्यावेळी माणूस आपला संयम किती राखतो यावरून त्याच्या मानसिकतेची ओळख पटते.4 / 8जेव्हा एखाद्याकडून काहीच मिळण्याची अपेक्षा नसते तेव्हा तो तुम्हाला कशी वागणूक देतो यावरून त्याचा खरेपणा सिद्ध होतो.5 / 8शब्दाला जागणे आणि विचारांमध्ये स्पष्टता असणारी माणसं विश्वासार्ह असतात.6 / 8नजर चोरून बोलणं किंवा बोलण्यात वारंवार बदल करणं ही लबाडीची लक्षणं असू शकतात.7 / 8 जी व्यक्ती तुमच्यासमोर इतरांच्या उणिवा काढते ती तुमच्या पाठीमागे तुमचीही निंदा करण्याची शक्यता जास्त असते.8 / 8माणसाचे शब्द क्षणिक असू शकतात पण त्याचे कृतित्व आणि वागणूक त्याच्या खऱ्या व्यक्तित्वाची साक्ष देतात.