By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:20 IST
1 / 9ज्या लोकांना खूप राग येतो अशी व्यक्ती संवेदनशील असते. इतरांनी केलेली साधी थट्ट किंवा दिलेला सल्लाही त्यांना वैयक्तिक टिका वाटू शकते. ( 10 Signs That You're Might Be A Short Tempered Person) 2 / 9ज्यांना खूप राग येतो. त्यांना सहसा सर्व गोष्टी परफेक्ट आणि त्यांच्या मनाप्रमाणे हव्या असतात. कामात थोडी जरी चूक झाली किंवा गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या नाहीत तर त्यांचा संयम तुटतो. (10 Warning Signs That You Might Be A Short Tempered Person)3 / 9अनेकदा रागीट माणसं मनात काहीही न ठेवता तोंडावर बोलतात. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा कधीकधी इतरांना कठोर वाटतो. कारण ते परिणामांचा विचारच करत नाहीत.4 / 9अशा व्यक्तींना अन्याय सहन होत नाही जेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्यावर किंवा कोणावर तरी अन्याय झाला आहे तेव्हा त्यांचा राग एक संरक्षण कवच म्हणून बाहेर येतो.5 / 9 संयम कमी असणं हे रागीट स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. रांगेत उभं राहणं, वाहतूक कोंडि किंवा एखाद्या उत्तराची वाट पाहणं अशा गोष्टींमुळे त्यांची चिडचिड होते.6 / 9ज्यांना जास्त राग येतो त्यांना परिस्थिती आणि माणसं आपल्या नियंत्रणात राहावीत असं वाटतं. जेव्हा गोष्टी त्यांच्या हाताबाहेर जातात तेव्हा त्यांना खूप राग येतो.7 / 9 स्वत:कडून आणि इतरांकडून खूप अपेक्षा ठेवल्यामुळे पदरी निराशा येते आणि हीच निराळा पुढे रागाच्या रुपात बाहेर पडते.8 / 9अनेकदा खूप रागीट व्यक्ती मनानं स्वच्छ असतात. त्यांच्या मनात कपट कमी असते कारण जेे काही असते ते त्यांच्या रागात स्पष्ट दिसते. 9 / 9अनेकदा खूप रागीट व्यक्ती मनानं स्वच्छ असतात. त्यांच्या मनात कपट कमी असते कारण जेे काही असते ते त्यांच्या रागात स्पष्ट दिसते.