हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

Published:December 24, 2021 05:23 PM2021-12-24T17:23:43+5:302021-12-24T17:40:17+5:30

हिंदी चित्रपटात अभिनेत्री ही शोभेची बाहुली कधीच नव्हती. नायकांच्या अभिनयाचा प्रभाव आणि लोकप्रियतेचं वलन भेदत जुन्या काळातल्या अभिनेत्रींनीही स्वत:ची एक ओळख निर्माण केली होती. जी आजही कायम आहे. पण पूर्वी चित्रपट चालायचे, बॉलिवूडचा गल्ला गोळा व्हायचा तो केवळ हिरोच्याच नावावर. हिरोंच्या नावावर चित्रपट चालण्याचा ट्रेण्ड आजही आहे, पण यासोबतच अभिनेत्रींच्या नावावर चित्रपट चालण्याचा एक नवीन ट्रेण्ड विद्या बालन, कंगना राणावत, दीपिका पदूकोण, करिना कपूर, तापसी पन्नू यासारख्या गुणी अभिनेत्रींनी बॉलिवूडमधे नुसता आणला नाहीतर सेटही केला. स्वत:च्या खांद्यावर अख्खा चित्रपट पेलणार्‍या या अभिनेत्रींची केवळ लोकप्रियताच वाढली नाही तर त्यांनी आपल्या भूमिकांच्या बळावर मानधनाचा आकडाही वाढवला. आज बॉलिवूडमधे अनेक अभिनेत्री अभिनेत्यांच्या बरोबरीने किंबहुना काहीजणीतर अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन घेतात.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

कंगना रनौट : कंगना आज राजकीय चर्चांमुळे वादाच्या भोवर्‍यात असली तरी कंगनाची राजकीय वक्तव्य एका बाजूला आणि कंगनाचा अभिनय एका बाजूला असा सुजाण फरक प्रेक्षक करतात केवळ कंगनाच्याच बाबतीत. त्यामुळे तिची पॉलिटिकल मतं पटली नसली तरी तिच्या अभिनयाला दाद मात्र भरभरुन मिळते. कंगनानं अभिनयाच्या जोरावर स्वत:चं नाव घराघरात पोहोचवलं. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे आज तिची बॉलिवूडमधे कोणाशीही तुलना केली जात नाही. कंगनासारखी कंगनाच असा तिचा रुबाब आहे. या रुबाबाच्या जोरावरच बॉलिवूडची ही ‘क्वीन’ एका चित्रपटासाठी 27 कोटी मानधन घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

दीपिका पदूकोण: दीपिकाचा जसजसा एक एक चित्रपट प्रदर्शित होत गेला तसतशी दीपिका प्रेक्षकांना कळू लागली. आधी तिच्या उंचीची चर्चा व्हायची. पण आता दीपिकाच्या अदकारीनं आणि सौंदर्यानं एवढी उंची गाठली आहे की चित्रपटात दीपिका आहे ना मग फक्त दीपिकासाठी चित्रपट पाहायचा असं ठरवून तिचे चित्रपट पाहिले जातात. तिची अभिनयाची ताकद आणि ग्लॅमरचं मोल एवढं वाढलंय की दीपिका एका चित्रपटासठी 26 कोटी मानधन घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

श्रध्दा कपूर: श्रध्दा कपूरच्या दिसण्यात ग्लॅमर नव्हतं. ती जसजशी लोकप्रिय होत गेली तसं तिचं ग्लॅमर वाढलं. स्त्री, हैदर, छिछोरे यासारख्या चित्रपटातल्या तिच्या अभिनयानं चित्रपट समीक्षकांची वाहवा मिळवली. तेव्हा कुठे श्रध्दा कपूरच्या अभिनयाकडे प्रेक्षक गांभिर्यानं पाहू लागले. सुपर डुपर हिट अभिनेत्यासोबत काम न करताही आपल्या अभिनयाच्या बळावर तिनं तिचं बॉलिवूडमधील मूल्यं वाढवलं. आज श्रध्दा कपूर एका चित्रपटासाठी 23 कोटी रुपये मानधन घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

आलिया भट: आलिया चित्रपटात काम करु लागली तेव्हा तिचा अभिनय वगैरे याची चर्चा व्हायची नाही. तर तिच्या नावाचा उपयोग करुन होणारे विनोद व्हायरल होत होते. व्हायरल होणार्‍या विनोदातील अल्लड आलिया हिच का असं आज तिचा अभिनय पाहून वाटतं. सोशल व्हायरलमधील आलिया ही ओळख केव्हाच मागे पडून आपण बॉलिवूडमधे खानदानाच्या नावावर नाही तर आपल्या अभिनयाच्या ताकदीवर चालतो हे आलियानं राज सारख्या चित्रपटातून सिध्द करुन दिलं. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक यांची एकाच वेळी दाद मिळवणारी आलिया भट चित्रपटासाठी 22 कोटी रुपये मानधन घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

प्रियंका चोप्रा: प्रियंकाला केवळ बॉलिवूड अभिनेत्री किंवा निर्माती म्हणणं हा तिच्यावर अन्याय ठरेल असं काम तिनं हॉलिवूडमधेही केलं. आज बॉलिवूड आणि हॉलिवूडमधे नाव आणि लोकप्रियता कमावणारी प्रियंका ही भारतातील पहिली अभिनेत्री. तिच्याकडे इंटरनॅशनल आयकॉन म्हणून पाहिलं जातं. सध्या हिंदी चित्रपटात ती अभिनेत्रीच्या भूमिकेत नसली तरी निर्माती म्हणून तिची ओळख आहे. पण बॉलिवूडला अजूनही अभिनेत्री म्हणून प्रियंका हवी आहे. प्रियंका चोप्रा नावाचा दबदबा आजही बॉलिवूडमधे असल्यानं तिचा मानधनाचा आकडा 21 कोटी रुपये आहे.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

करिना कपूर: करिना हे नाव आणि चित्रपटातला तिच्या भूमिकेतला वावरही चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी पुरेसा आहे. आधी खूप चमको वाटणार्‍या करिनाचा अभिनय जब वी मेट, चमेली यासारख्या चित्रपटानंतर फुलत गेला. तलाश सारख्या चित्रपटात अमीर खान असतानाही तो चित्रपट लक्षात राहिला तो करिनाच्या दिसण्यामुळे आणि अभिनयामुळे. गेल्या दोन दशकापासून बॉलिवूडच्या पडद्यावर लिहिलं गेलेलं करिना कपूर हे नाव दिवसेंदिवस आणखी ठळक होत आहे. त्यामुळे करिना अजूनही चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

कतरिना कैफ: सुरुवातीला कतरिना म्हणजे बॉलिवूडची चिकनी चमेली. कदाचित एक चार पाच चित्रपटानंतर ही बॉलिवूडवर तिचे पाय टिकू शकणार नाही असं टीकाकार म्हणाले. पण अभिनय, संवाद फेक या प्रत्येक बाबतीत प्रत्येक चित्रपटागणिक स्वत:ला इम्प्रूव्ह करणार्‍या कतरिनानं आपला बॉलिवूडमधला खुंटा बळकट केला. तिचं दिसणं, तिचं नृत्य, तिचा अभिनय या सगळ्यांनाच इतकं मोल आहे की ती एका चित्रपटासाठी 18 कोटी रुपये मानधन घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

विद्या बालन: विद्या बालननं परिणिता या चित्रपटातून तयार केलेलं तिच्या अभिनयाचं वलय आज जराही कमी झालेलं नाही. सुलू, कहानी सारखे चित्रपट फक्त विद्यासाठी म्हणून लोक थिएटरमधे बघायला गेले. विद्या बालनचा कोणताही चित्रपट असू दे , तिच्या अभिनयात इतकी ताकद आहे की ती कधीच प्रेक्षकांना नाराज करत नाही. खूप चित्रपट करत नसली तरी तिचा दबदबा कायम असल्याने ती एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

अनुष्का शर्मा : अभिनेत्री, निर्माती म्हणून ओळख असलेली बॉलिवूडमधील टॅलेण्टेड अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. सध्या ती चित्रपटात काम करत नसली तरी अनुष्का शर्मा बॉलिवूडमधलं लोकप्रिय नाव असून ते नाव तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं कमावलं आहे. आज याच टॅलेण्टवर ती एका चित्रपटासाठी 14 कोटी रुपये घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

दिशा पटणी: तरुण पिढीत लोकप्रिय असणारा एक फ्रेश चेहरा म्हणजे दिशा पटणी. धोनी चित्रपटातल्या तिच्या छोट्याशा भूमिकेने तिला इतकी लोकप्रियता दिली की स्टार नायिकांमधे तिची गणना होवू लागली. याच जोरावर ती आज 7 कोटी रुपये मानधन घेते.

हिरोईन कौन है? - आपल्या नावावर सिनेमा चालवत तगडे मानधन घेणाऱ्या 11 अभिनेत्री!

तापसी पन्नू: खरंतर हे नाव इतक्या शेवटी कसं असा प्रश्न कोणालाही पडेल इतकी ताकद तापसीच्या भूमिकांमधे असते. सतत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याची आवड जपणार्‍या तापसीचं बॉलिवूडमधील स्टार मूल्य पिंक, थप्पड यासारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे वाढलं. तापसीत असणार्‍या क्षमतेच्या तुलनेत ती फारच कमी म्हणजे 5 कोटी मानधन घेते.