By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:31 IST
1 / 11पॅक केलेल्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणाचा रंग पाहून तुम्ही कधी विचार आला आहे का की, हा रंग केवळ डिझाइनसाठी आहे की त्याचा काही खास अर्थ आहे? सोशल मीडियावर अनेकदा असा दावा केला जातो की, झाकणाचा प्रत्येक रंग वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याचे संकेत देतो.2 / 11तज्ज्ञांच्या मते, हे रंग खरोखरच पाण्याच्या प्रकाराबद्दल आणि त्याच्या उपयोगाबद्दल माहिती देऊ शकतात. मात्र, बाटली खरेदी करताना नेहमी 'लेबल' वाचणं सर्वात सुरक्षित ठरतं. निळा, काळा, हिरवा, पांढरा, लाल झाकणाचा अर्थ जाणून घेऊया...3 / 11'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, झाकणाचा रंग अनेकदा पाण्याचा प्रकार दर्शवतो. उदाहरणार्थ, निळं झाकण हे सहसा 'स्प्रिंग वॉटर' (झऱ्याचे पाणी) दर्शवतं, ज्यामध्ये नैसर्गिक मिनरल्स असतात.4 / 11काळं झाकण हे 'अल्कलाईन वॉटर'साठी असतं, जे शरीरातील एसिडिटी कमी करण्यास मदत करू शकतं. 'अल्कलाईन वॉटर' हे प्रामुख्याने सेलिब्रिटी पितात. 5 / 11हिरवं झाकण हे 'फ्लेवर्ड' किंवा चवीच्या पाण्याचे संकेत देतं. बाजारात खासकरून हिरवं झाकण असलेल्या पाण्याच्या बाटल्या दिसतात. 6 / 11पांढरं किंवा पारदर्शक झाकण हे फिल्टर केलेल्या किंवा प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) पाण्यासाठी वापरलं जातं. अनेक बाटल्यांना पांढरं झाकण असतं. 7 / 11लाल झाकण हे 'इलेक्ट्रोलाइट वॉटर' दर्शवतं. तर पिवळं किंवा सोनेरी झाकण हे व्हिटॅमिनयुक्त पाण्याचे संकेत देतं.8 / 11तज्ज्ञांच्या मते, वेगवेगळ्या रंगाचं झाकण असलेलं पाणी विविध गरजांनुसार उपयुक्त ठरू शकतं. उदाहरणार्थ, खेळाडू किंवा व्यायाम करणारे लोक शरीरातील मिनरल्सची कमतरता भरून काढण्यासाठी 'इलेक्ट्रोलाइट वॉटर' (लाल झाकण) निवडू शकतात. 9 / 11दैनंदिन गरजांसाठी सामान्य पॅकबंद पाणी किंवा स्प्रिंग वॉटर (निळे किंवा पांढरं झाकण) पुरेसे आहे. ज्यांना चवीत बदल हवा आहे, त्यांना फ्लेवर्ड पाणी (हिरवं झाकण) आवडतें. मात्र अल्कलाईन किंवा व्हिटॅमिनयुक्त पाण्यामुळे आरोग्याला खूप मोठे फायदे होतात, मात्र याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.10 / 11डॉक्टरांच्या मते, झाकणाचा रंग कोणताही असो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिणं. रंग केवळ एक संकेत देतो, पण पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी बाटलीवरील 'लेबल' वाचणं अत्यंत आवश्यक आहे. 11 / 11रोजच्या आयुष्यात नॉर्मल पाणी पिणं पुरेसं आहे आणि कोणताही विशिष्ट रंग आरोग्यासाठी अनिवार्य नाही. त्यामुळे, बाटली खरेदी करताना रंगाकडे एक सामान्य माहिती म्हणून पाहा आणि खात्री करण्यासाठी लेबलवरील माहितीवरच विश्वास ठेवा.