Join us

Heart Attack चे कारण ठरते वाढलेले बॅड कोलेस्टेरॉल, कोलेस्टेरॉल कमी करण्याचे नॅचरल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:35 IST

1 / 7
Cholesterol Reduce Home Remedies : आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लोकांमध्ये हाय कोलेस्टेरॉलची समस्या खूप वाढत चालली आहे. ज्यामुळे हृदयरोग, हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. मेणासारखा हा पदार्थ नसा ब्लॉक करतो. ज्यामुळे शरीरात योग्यपणे रक्तप्रवाह होत नाही. अनेक एक्सपर्ट तर हाय कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर मानतात.
2 / 7
हृदयरोग टाळायचे असतील तर शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. याची अनेक औषधंही मिळतात. पण जर तुम्हाला औषधं खायची नसतील आणि काही नॅचरल उपायांनी कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
3 / 7
लसणामध्ये अॅलिसिन नावाचं एक खास तत्व असतं, ज्यामुळे शरीरात जमा झालेले बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. नियमितपणे जर लसूण खाल्ला तर धमण्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर निघतं. ज्यामुळे रक्तप्रवाह सुद्धा सुधारते. तसेच हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
4 / 7
आंबट-तुरट चव असलेल्या आवळ्यांमध्ये व्हिटामिन सी भरपूर असतं. जे धमण्या साफ ठेवतं. सोबतच बॅड कोलेस्टेरॉल ऑक्सिडाइज होण्यास मदत करतं. व्हिटामिन सी मुळे कोलेस्टेरॉल गळून शरीरातून बाहेर पडतं. त्यामुळे नियमितपणे आवळे, आवळ्याचं पावडर वापरू शकता.
5 / 7
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक भरपूर प्यायलं जातं. ताकामधील प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सनं शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल दूर करण्यासही मदत मिळते. यानं पोट शांत राहतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं.
6 / 7
ओट्समध्ये बीटा-ग्लूकन नावाचं फायबर असतं जे आतड्यांमध्ये चिकटून बसलेलं कोलेस्टेरॉल कमी शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतं. रोज एक वाटी ओट्स खाल्ले तर कोलेस्टेरॉलची समस्या लवकरच दूर होते.
7 / 7
अळशीच्या बियांमध्ये डायटरी फायबर असतं जे कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतं. तसेच यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं जे सूज कमी करतं आणि हृदयासाठी चांगलं असतं.
टॅग्स : हृदयरोगउष्माघातहेल्थ टिप्सआरोग्यहृदयविकाराचा झटका