Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मुलांच्या पोटात जंत झाले आहेत हे सांगणारी ९ लक्षणं! मुलं पोटदुखीने पडतील आजारी - वाढ खुंटेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 20:05 IST

1 / 11
लहान मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना सकस, संतुलित आहार मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे शरीर आतून स्वच्छ राहणेही गरजेचे आहे. लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालक नेहमीच खूप जास्त काळजी घेतात, पण अनेकदा काही लहानसहान समस्या दुर्लक्षित राहतात. त्यापैकीच एक सामान्य समस्या म्हणजे पोटात जंत होणे. हे जंत केवळ पोटदुखीचीच समस्या निर्माण करत नाहीत, तर मुलांमध्ये लोहाची कमतरता आणि कुपोषणाचीही समस्या वाढवू शकतात( causes of pinworms in children).
2 / 11
जर वेळेत ही समस्या ओळखली नाही, तर मुलांच्या वाढीवर आणि (stomach worms symptoms in kids) आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या पोटांत जंत झाल्याची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. मुलांच्या पोटांत जंत झाल्याची प्रमुख लक्षणे नेमकी कोणती ते पाहूयात.
3 / 11
मुलांना वारंवार पोटात दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोटाला पीळ पडल्यासारख्या वेदना होतात. मुलांना नेमकं कारणं न समजता वरचेवर सारखं पोट दुखतंय असं मुलं म्हणतात.
4 / 11
काही मुलांची भूक अचानक कमी होते, तर काही मुलं खूप जेवूनही त्यांचं वजन वाढत नाही. त्यांना सतत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते.
5 / 11
हे जंत असल्याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मुलांना गुदद्वाराच्या जागी खूप खाज सुटते, ज्यामुळे त्यांची झोपही विस्कळीत होते.
6 / 11
कित्येकदा मुलांच्या पोटांत जंत झाल्यावर शरीराच्या तुलनेत पोट जास्त फुगलेले दिसते. शरीर बारीक मात्र पोट फुगलेलं दिसतं.
7 / 11
मलात पांढरे जिवंत धाग्यासारखे जंत दिसणे.
8 / 11
शरीरातील पोषक तत्व जंत शोषून घेत असल्यामुळे मुलांना लवकर थकवा येतो आणि ते विनाकारण चिडचिड करू लागतात.
9 / 11
झोपेत असताना मुलांच्या तोंडातून सतत लाळ गळत असेल, तर ते पोटातील जंतांचे लक्षण असू शकते. मुलं पटकन थकतात आणि ऊर्जेची कमतरता जाणवते.
10 / 11
कधी कधी मळमळ किंवा उलट्या होण्याची शक्यता असते.
11 / 11
पचनाच्या समस्या जसे अतिसार किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपालकत्वलहान मुलं