Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शुगर वाढतेय-डायबिटीस होणार, तब्येत सांगते ओरडून पण..? पाहा कोणती लक्षणं ओळखली तर टळतो आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 15:43 IST

1 / 6
किडनीचा त्रास असेल किंवा डायबेटीस असेल तर काही पदार्थ आहार घेतल्यास किडनीवर ताण वाढू शकतो आणि साखरेचं प्रमाणही बिघडू शकतं. त्यामुळे काही पदार्थ शक्यतो टाळणंच योग्य ठरतं.
2 / 6
चिप्स, पापड, लोणचं, प्रोसेस्ड स्नॅक्स यामध्ये सोडियम खूप जास्त असतं. जास्त मीठामुळे किडनीवर ताण येतो आणि ब्लड प्रेशर वाढतं, जे किडनीसाठी धोकादायक ठरु शकतं.
3 / 6
मिठाई, केक, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. डायबिटीस असताना हे पदार्थ रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात आणि किडनीवरही परिणाम करतात.
4 / 6
प्रोटीन सप्लिमेंट्स यामुळे किडनीवर ताण येतो. किडनी नीट काम करत नसेल, तर जास्त प्रोटीन हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे अति प्रमाणात प्रोटीन मिळेल असे पदार्थ टाळा.
5 / 6
केळी, बटाटा, टोमॅटो, संत्री यामध्ये पोटॅशियम जास्त असतं. किडनी जर निरोगी नसेल कोणताही त्रास असल्यास शरीरातून पोटॅशियम नीट बाहेर पडत नाही, त्यामुळे ते वाढत जातं.
6 / 6
बिस्किटं, इंस्टंट नूडल्स, रेडी-टू-ईट पदार्थ यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, मीठ आणि साखर जास्त असते. हे पदार्थ डायबिटीस आणि किडनी दोन्हीसाठी घातक ठरतात.
टॅग्स : मधुमेहहोम रेमेडीआरोग्यहेल्थ टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स