1 / 6धुळीमध्ये गेल्यावर कित्येक जणांना श्वासाचा खूप त्रास होतो. एकामागून एक शिंका येतात, त्यामुळे नाक बंद होते. श्वास घ्यायला त्रास होतो. असा त्रास होऊ नये म्हणून पुढे सांगितलेले काही उपाय करणे खूप फायदेशीर ठरू शकते.2 / 6पहिला उपाय म्हणजे अनुलोम विलोम करणे. हे प्राणायाम केल्याने शरीरातले वेगवेगळे ब्लॉकेज ओपन होण्यास मदत होते. श्वास घेण्यास त्रास होत नाही.3 / 6दुसरा उपाय म्हणजे कपालभाती प्राणायाम. श्वासाशी संबंधित कित्येक तक्रारी कमी करण्यासाठी हे प्राणायाम उपयुक्त ठरते.4 / 6तिसरा उपाय म्हणजे भ्रस्त्रिका प्राणायाम. संथ श्वास घेणे आणि जोर लावून तो बाहेर टाकणे अशा पद्धतीच्या या प्राणायाममुळे फुफ्फुसांची ताकद वाढते.5 / 6वर सांगितलेले प्राणायाम तर नियमितपणे कराच. पण त्यासोबतच धुळीमध्ये जाण्यापुर्वी बोटावर थेंबभर खोबरेल तेल किंवा साजूक तूप घ्या आणि ते नाकपुडीला आतून लावा. 6 / 6धुळीमध्ये जाताना मास्क लावा किंवा रुमालाने नाक, तोंड झाकून घ्या. यामुळेही धुळीचा त्रास होत नाही.