1 / 8मार्चचा पहिलाच आठवडा असला तरी उन्हाचा कडाका सगळीकडे प्रचंड वाढलेला आहे. अशातच पुढचे २- ३ दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कोकण आणि विदर्भात प्रचंड उकाडा वाढणार असून दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता सांगितली आहे.(summer special health tips)2 / 8अशा विचित्र हवामानामुळे उष्माघाताचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे अगदी आतापासूनच काही गोष्टींची खबरदारी घ्यायला सुरुवात करणं गरजेचं आहे (5 tips to avoid the risk of heat stroke in summer). कारण आताच दुपारच्यावेळी घराबाहेर जायला नकोसं वाटत आहे. घरातही पंख्याशिवाय बसणं कठीण झालं आहे. मार्चच्या सुरुवातीला हे हाल आहेत तर मे मध्ये कसं होणार अशी चिंता जवळपास सगळ्यांनाच आहे. म्हणूनच या परिस्थितीत उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे..(how to avoid the risk of heat stroke?)3 / 8शक्यतो भर दुपारी म्हणजेच १ ते ४ या दरम्यान शक्य असल्यास घरातच थांबावे. उन्हात जाणे टाळावे. उन्हात जायचे असल्यास डोक्याला पुर्णपणे सुती कपडा गुंडाळून घ्यावा. गॉगल घालावा.4 / 8या दिवसांत तंग, गडद रंगाचे, जाडसर कपडे घालू नका. अंगातले कपडे सुती, सैलसर असावे. जेणेकरून उष्णतेचा जास्त त्रास होणार नाही.5 / 8कडक उन्हातून घरात आल्यावर लगेच थंडगार एसीमध्ये जाऊन बसू नका. कारण शरीराला बदलत्या तापमानासोबत जुळवून घ्यायला वेळ लागतो आणि तेवढा वेळ त्याला दिलाच पाहिजे.6 / 8पाणी भरपूर प्रमाणात प्या. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली कायम सोबत असू द्या. 7 / 8त्यासोबतच नारळपाणी, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, बडिशेपाचं सरबत यासारखी पेयं दिवसभरात अधून मधून प्या. यामुळेही डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.8 / 8कच्चा कांदा खा. त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. तसेच खडीसाखर, काकडी, टरबूज, खरबूज असे पदार्थही खा. यामुळे शरीरातली पाणी पातळी स्थिर राहण्यास मदत होते.