दात किडले, हिरड्या काळपट पडल्या? ४ उपाय, दातांची दुखणी आणि खर्च वाढणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:13 IST
1 / 7मुलं असो किंवा म्हातारी माणसं. गोड खाल्ल्यानंतर दातांची स्वच्छता करण्यात निष्काळजीपणा केल्यास दातांमध्ये किड लागू शकते. ज्यामुळे दात पूर्णपणे खराब होतात.अशावेळी लोकांना डेंटिस्टकडे जावं लागत आणि दात काढून टाकले जातात. कारण यामुळे दुसरे दातही खराब होण्याचा धोका असतो.2 / 7आजी आजोबांनी पूर्वी सांगितलेला हा उपाय करून तुम्ही दातांना लागलेली किड सहज काढून टाकू शकता. एक घरगुती उपाय करून तु्म्ही दातांना लागलेली किड सहज बाहेर काढू शकता. 3 / 7दातांना कीड लागली असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी मोहोरीच्या तेलात हळद आणि मीठ मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांना लावून ब्रशच्या साहाय्यानं किड काढून घ्या, नंतर ब्रश करा. दिवसातून २ वेळा हा उपाय केल्यास दातांची किड सहज बाहेर येईल आणि दात स्वच्छ होण्यास मदत होईल.4 / 7दातांची किड बाहेर काढण्यासाठी तुम्ही तुरटीच्या पावडरचा वापर करू शकता. यात सैंधव मीठ मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट दातांना लावून ब्रश करा. असं केल्यानं दातांना लागलेली किड सहज बाहेर निघण्यास मदत होईल.5 / 7दातांना किड लागली असेल तर या पासून आराम मिळवण्याासठी तुम्ही लवंगाचं तेल वापरू शकता. हे तेल काही वेळासाठी दातांवर लावून ठेवा. रोज असं केल्यानं दातांची किड निघून जाण्यास मदत होईल आणि दात दुखीच्या वेदनांपासूनही आराम मिळेल.6 / 7हिंगाची पावडर दातांना लावून तुम्ही दातदुखीच्या, दात किडन्याच्या त्रासापासून आराम मिळवू शकता.7 / 7हा उपाय करण्यासाठी हिंगाची पावडर पाण्यात घालून उकळवून घ्या नंतर कोमट झाल्यानंतर हे पाणी उकळवून या पाण्यानं गुळण्या करा. ज्यामुळे दातांची किड निघून जाण्यास मदत होईल.