1 / 8डायबिटीसचा आजार संपूर्ण भारतात वेगानं पसरत आहे. अजूनही कोणतेही ठोस उपचार या आजारावर उपलब्ध झालेले नाही. हेल्दी डाएट आणि व्यायाम करून हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. शुगर कंट्रोसासाठी काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Diabetes Control Tips)2 / 8 डायबिटीसच्या रुग्णांनी सकाळी लवकर उठून शुगर तपासायला हवी. शुगर कंट्रोल करण्यासाठी आराम करणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. डायबिटीसच्या रुग्णांनी सकाळी उठल्यानंतर साखर तपासावी. नंतर त्यांना शुगर लेव्हचा अंदाज येईल आणि किती इंसुलिन घेण्याची गरज आहे हे लक्षात य़ेईल.3 / 8शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फिजिकल एक्टिव्हीज करणं गरजेचं असतं. यासाठी सकाळी कमीत कमी ३० मिनिटं व्यायाम करायला हवा. योगा किंवा इतर फिजिकल एक्टिव्हीजमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता.4 / 8 डायबिटीक रुग्णांनी रोज वेळेवर नाश्ता करून डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्यायला हवीत. नाश्त्यात कार्बोडायड्रेट्स, फायबर्स आणि प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. पोहे, इडली, चपाती, अंडी, डाळीचे थालिपीठ यांचा आहारात समावेश करा. 5 / 8 संपूर्ण दिवसभरात ब्लड शुगरकडे लक्ष द्यायला हवं. खासकरून दुपारचं जेवण झाल्यानंतर इंसुलिनच्या प्रमाणाकडे लक्ष द्यायल हवं. ब्लड शुगर मॅनेज करण्यासाठी यामुळे मदत होईल. दिवसभर भरपूर पाणी प्यायला हवं.6 / 8डायबिटीक रुग्णांनी थोड्या थोड्या वेळानं काहीतरी खात राहायला हवं. यामुळे शुगर लेव्हल अचानक वाढणं किंवा कमी होण्याचा धोका टळतो. ड्रायफ्रुट्स, भाज्या, फळं तुम्ही खाऊ शकता. हाय कार्ब्स, स्नॅक्स, कुकीज, केक्स, कॅण्डीज यांसारखे पदार्थ खाऊ नयेत. शिड्या चढणं, फिरणं, चालणं, स्ट्रेचिंग असे व्यायाम करून संपूर्ण दिवस एक्टिव्ह राहायला हवं.7 / 8रात्रीच्या जेवणात प्रोटीन्स कार्ब्स आणि भाज्यांचा समावेश असावा. ब्राऊन राईस, ग्रील चिकन किंवा उकळलेल्या भांज्यांचा समावेश तुम्ही करू शकता. जेवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषधं घ्या.8 / 8झोपण्याआधी मेडीटेशन, ब्रिदिंग व्यायाम करा. यामुळे ताण तणाव दूर होऊन चांगली झोप मिळण्यास मदत होईल. याशिवाय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहील. रोज कमीत कमी ८ तासांची झोप घ्यायला हवी.