1 / 11कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा वेगाने प्रसार सुरू झाला आहे. सिंगापूरमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. येथे LF.7 आणि NB.1.8 नावाच्या व्हेरिएंटची प्रकरणं वाढत आहेत. या दोन्ही व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे.2 / 11आशियामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतातही भीतीचे वातावरण आहे. यावर भारतातील डॉ. रमण गंगाखेडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या किंवा मृत्यूची संख्या वाढल्याशिवाय घाबरून जाण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. 3 / 11एका मुलाखतीत डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, हे दोन्ही व्हेरिएंट ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट आहेत आणि ते JN.1 व्हेरिएंटशी संबंधित आहेत, जो स्वतः ओमायक्रॉन BA.2.86 चा एक भाग आहे. 4 / 11WHO ने याआधी म्हटलं होतं की JN.1 आणि त्याच्यासारख्या व्हेरिएंटमध्ये इम्यून सिस्टमपासून वाचण्याची क्षमता आहे, परंतु अद्याप असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत की ते जुन्या ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा जास्त गंभीर आजार निर्माण करतात.5 / 11हा एक RNA व्हायरस असल्याने तो स्वतःमध्ये बदल करू शकतो आणि नवीन व्हेरिएंट तयार करू शकतो. ओमायक्रॉनशी संबंधित असे प्रकार इतर देशांमध्येही दिसून येत आहेत. 6 / 11जोपर्यंत व्हायरसमुळे मृत्यू वाढत नाहीत किंवा गंभीर आजाराची प्रकरणे वाढत नाहीत तोपर्यंत घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ रुग्णांची संख्या वाढत आहे याचा अर्थ परिस्थिती आणखी बिकट होत आहे असं नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 7 / 11JN.1 व्हेरिएंटची लक्षणं 'सौम्य ते मध्यम' आहेत. JN.1 व्हेरिएंटशी संबंधित काही लक्षणं म्हणजे घसा खवखवणं, ताप, नाक गळणं, कोरडा खोकला, थकवा, डोकेदुखी आणि चव न समजणं किंवा वास न येणं.8 / 11डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, जगात आता 'कन्व्हर्जंट इव्होल्यूशन' होत आहे, म्हणजेच व्हायरस स्वतःमध्ये बदल करत आहे जेणेकरून तो औषधे आणि लसींच्या परिणामांपासून वाचू शकेल. हा व्हायरस स्वतःला अशा प्रकारे जुळवून घेतो की तो वेगाने पसरू शकतो आणि लोकांना न मारता जगू शकतो.9 / 11जर अचानक रुग्ण वाढले तर या लसीचं उत्पादन वाढवता येईल. पण सध्या तरी काळजी करण्यासारखं काही नाही. आपण हे मान्य केलं पाहिजे की कोरोना आता एक नॉर्मल आजार बनला आहे. वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी खबरदारी घ्यावी, जसं की हात धुणं, मास्क घालणं आणि गर्दी टाळणं.10 / 11 १९ मे पर्यंत भारतात फक्त २५७ एक्टिव्ह रुग्ण आहेत आणि त्या सर्वांमध्ये सौम्य लक्षणं आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं की, भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटविरुद्ध बनवलेली लस उपलब्ध आहे. GEMCOVAC-19 असं नाव आहे. ही भारतातील पहिली mRNA लस आहे.11 / 11जोपर्यंत व्हायरसचा मोठा धोका दिसत तोपर्यंत बूस्टर डोसची आवश्यकता नाही, अगदी वृद्धांसाठीही नाही. आतापर्यंत आमच्याकडे बूस्टर डोसची गरज सिद्ध करणारा कोणताही ठोस वैज्ञानिक डेटा नाही. सध्या जीनोम सिक्वेन्सिंगची गरज नाही. हे महाग आहे आणि जेव्हा रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची संख्या वाढू लागते तेव्हाच ते केले पाहिजे असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.