Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

Published:August 1, 2022 04:55 PM2022-08-01T16:55:57+5:302022-08-02T14:39:01+5:30

Breastfeeding week 2022 :स्तनपान (breast feeding) हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असलं तरी अनेकींना सुरुवातीचे काही दिवस पुरेसं दूध येत नाही. आपल्या बाळाचं पोट भरत नाही या चिंतेनं त्या चिंतीत असतात. अशा चिंतेचाही आईच्या दुधावर परिणाम होतो. चिंता न करता तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय केल्यास (tips for increasing breast milk supply) दूध वाढतं. दूध वाढण्यासाठी पोषण तज्ज्ञ आहारात ७ गोष्टींचा (foods to increasing breast milk supply) समावेश आवर्जून करण्यास सांगतात.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

स्तनपान करणं हे बाळ आणि आई या दोघांच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. बाळाचं वजन आरोग्यदायी पध्दतीनं वाढण्यासाठी बाळासाठी आईचं दूध महत्वाचं असतं. आईच्या दुधामुळेच बाळाचा बुद्धयांक वाढतो. बाळाची पचनशक्ती सुदृढ होते आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते. बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध जसं महत्वाचं असतं तसंच आईलाही बाळाला स्तनपान केल्यानं आरोग्यदायी फायदे होतात. कॅन्सर, टाइप 2 मधुमेह या आजारांचा धोका स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये कमी असतो. तसेच बाळांतपणात वाढणारं वजन स्तनपान केल्यानं कमी होतं, बाळासोबतच आईचं भावनिक नातं दृढ होतं. स्तनपान हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असलं तरी अनेकींना सुरुवातीचे काही दिवस पुरेसं दूध येत नाही. आपल्या बाळाचं पोट भरत नाही या चिंतेनं त्या चिंतीत असतात. अशा चिंतेचाही आईच्या दुधावर परिणाम होतो. चिंता न करता तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय केल्यास दूध वाढतं. पोषण तज्ज्ञ प्रीती त्यागी यांनी दूध वाढण्यासाठी आईनं आपल्या आहरात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याबद्दल मार्गदर्शन केलं आहे.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

मेथ्या: मेथीच्या दाण्यात ॲस्ट्रोजन हा घटक असतो. दूध वाढण्यासाठी स्तनदा मातेनं दिवसातून दोनदा मेथ्या दाणे घालून उकळलेलं पाणी (मेथ्यांचा चहा) प्याल्यास दूध वाढतं. मेथ्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मेथ्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 1 चमचा मेथ्या रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिल्यास त्याचा उपयोग दूध वाढण्यासाठी आणि हाडांची ताकद वाढण्यासाठी होतो.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

ओट्स : ओट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. दूध वाढण्यासाठी सकाळी नाश्त्याला ओट्स खावेत. ओट्समध्ये फायबर आणि ऊर्जेचं प्रमाण जास्त असतं. ओट्सचं सेवन दूध वाढण्यासाठी आणि शरीरातील लोह वाढण्यासाठीही होतो कारण ओट्समध्ये लोहाचं प्रमाण चांगलं असतं.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

लसूण: लसूण आणि दूध वाढण्याचा जवळचा संबंध आहे असं प्रीती त्यागी सांगतात. लसणात असलेले घटक दूध वाढवण्यास सहाय्यभूत असतात. दूध वाढण्यासाठी लसण्याच्या काही पाकळ्या भाजून त्या सूप किंवा भाजीत टाकून खाल्ल्यास त्याचा दूध वाढण्यासाठी फायदा होतो. तसेच अशा पध्दतीनं लसूण खाल्ल्यानं कॅन्सरचा धोकाही टळतो.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

बडिशेप: बडिशेप दूध वाढवणारा पारंपरिक घटक आहे. मेथ्यांप्रमाणेच बडिशेपातही ॲस्ट्रोजन हा घटक असतो. दूध वाढण्यासाठी पदार्थांवर वरुन भुरभुरुन बडिशेप खावी किंवा मेथ्यांप्रमाणे बडिसेपाचा चहा करुन प्यावा.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

जिरे: पचनासाठी उपयुक्त असलेल्या जिऱ्याचा उपयोग दूध वाढण्यासाठीही होतो. जिऱ्यामध्ये जीवनसत्वं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. कच्च्या सॅलडमध्ये जिरे घालून खाता येतं. किंवा रात्रभर 1 चमचा जिरे पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि ते पाणी सकाळी उठल्यावर पिल्यास त्याचा दूध वाढण्यासाठी फायदा होतो.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

गायीचं दूध: गायीच्या दुधात फोलिक ॲसिड, कॅल्शियम आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. गायीचं दूध प्यायल्यानं स्तनदा मातेचं दूध तर वाढतेच पण तिच्या दुधातील पोषण मुल्यंही वाढतात. दूध वाढण्यासाठी स्तनदा मातेने प्रसूतीनंतर दिवसातून किमान 2 वेळा 1 ग्लास गाईचं दूध प्यावं.

Breastfeeding week 2022 : दूध वाढण्यासाठी स्तनपान करताना आहारात ठेवा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात पोषक आहार

तुळस: दूध वाढण्यासाठी तुळस महत्वाची वनस्पती आहे. तुळशीच्या नियमित सेवनामुळे प्रसूतीनंतर आतड्यांचं आरोग्य सुधारतं. भूक वाढते दूध वाढवण्यासाठी तुळशीच्या पानांचा चहा किंवा काढा करुन प्यावा. तुळशीचा चहा प्यायल्यानं दूध वाढण्यासोबतच मानसिक पातळीवर शांतता आणि आराम मिळतो.